--- हातकणंगले येथे सामाजिक न्याय विभागाच्या मुला व मुलींच्या वसतिगृह यांच्यावतीने स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध कलाविष्कार सादर
कोल्हापूर / प्रतिनिधी
जीवनात कितीही अडचणी ,संकटे आली तरी शिक्षणाची संधी सोडू नका. शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही. सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ही गोरगरीब, सर्वसामान्य विध्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारी ज्ञान मंदिरे आहेत. त्यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेऊन प्रत्येक विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करून आई-वडिलांसह गुरुजनांचे नाव उज्वल करावे असे मत शिरोळचे सिनेअभिनेते व प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी व्यक्त केले.
हातकणंगले येथे सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह व जयसिंगपूर येथील बीसी-ईबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष व सिनेअभिनेते
दगडू माने बोलत होते. हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक वसतिगृहाचे अधीक्षक उत्तम कोळी यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक तोंदले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान सर्वश्रेष्ठ असून संविधानामुळेच आपण स्वातंत्र्य आहोत. आपले हक्क आपल्याला समजेल आहेत. आपण आपल्या न्यायासाठी संघर्ष करू शकतो. त्यामुळे भारतीय संविधान प्रत्येकांनी वाचावे आणि त्याची प्रत आपल्या घरात ठेवावी असे सांगून त्यांनी वसतिगृहातील विध्यार्थ्यांनी सर्व सुविधांचा लाभ घेऊन कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहचवावे आशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालक प्रतिनिधी सागर जमणे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्वाच्या निमित्ताने पार पडलेल्या विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विध्यार्थी प्रतिनिधी जयदीप कांबळे,अमृता बाबर यांनी केले. अमर बोरगे यांनी आभार मानले. यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे संग्राम पाटील, पत्रकार कुणाल कांबळे,कवी संदीप पाटील,अरुण कोळी यासह बिव्हीजी कर्मचारी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वस्तीगृहामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी
विविध कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी पालकातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
----------
No comments:
Post a Comment