Friday, 3 February 2023

कुंभी कासारी निवडणुकीच्या कामकाजाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची उद्या बैठक


कोल्हापूर / प्रतिनिधी
 कुंभी कासारी सहकारी साखर 
कारखाण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या  कामकाजाबाबत नेमणूक झालेल्या शिक्षकांची बैठक उद्या घेण्यात येणार आहे. जुनी पेन्शन सर्वांना मिळावी, शिक्षक भरती बंदी त्वरीत उठवावी, कायम विना अनुदानित शाळांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत तसेच सार्वत्रिक निवडणुका शिवाय अन्य निवडणुकांचे कामे शिक्षकांना देऊ नयेत या मागण्यांसाठी लवकरच शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढूया असा निर्णय आमदार जयंत आसगावकर यांनी सभेत जाहीर केला. विद्याभवन येथील सभेस अध्यक्षस्थानी एस डी लाड होते.
   कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असून त्यासाठी कागल, करवीर, शाहूवाडी, राधानगरी तसेच कोल्हापूर शहरातील अनेक शिक्षकांना निवडणूक कार्याचे आदेश दिलेले आहेत.  नजीकच्या काळात इयत्ता दहावी, बारावी बोर्ड व शिष्यवृत्ती परीक्षा आदी कामांमध्ये शिक्षक गुंतणार आहेत. निवडणुक कामकाजाबाबत शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता विद्याभवन कोल्हापूर येथे या कामासाठी ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांची सभा घेण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी न चुकता वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केले.

     या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, 
व्ही. जी. पोवार, सुधाकर निर्मळे, काकासाहेब भोकरे, मिलिंद बारवडे, शिवाजी माळकर, सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, के. के. पाटील, आर. वाय. पाटील, मिलींद पांगिरेकर, संदीप पाथरे, उमेश देसाई, अरुण मुजुमदार, विजयमाला सुर्यवंशी, जगदीश शिर्के, वर्षा पाटील,आदी प्रमुखासह शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो 
शिक्षक आमदार जयंत आसगावकर बोलतांना शेजारी एस. डी. लाड दादासाहेब लाड, सुरेश संकपाळ, बाबासाहेब पाटील प्रा. सी.एम. गायकवाड व अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment