Friday, 3 February 2023

अशोकराव माने तंत्रनिकेतन वाठार तर्फ वडगाव येथे सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर

कोल्हापूर / प्रतिनिधी
श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार तर्फ वडगाव येथे सोमवार दिनांक ६-२-२०२३ ते बुधवार दिनांक ८-२-२०२३ पर्यंत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कोल्हापूर यांचे मार्फत सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
   जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाअंतर्गत सोमवार दिनांक ६ २- २०२३ रोजी १ वाजून ३० मिनिटांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व दुपारी २ वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मंगळवार दिनांक ७-२-२०२३ रोजी सहा गटातील स्पर्धकांच्या प्रदर्शनाचे निरीक्षण आणि मूल्यमापन होणार असून सकाळी १० ते १ या सत्रात *संशोधक घडताना' या विषयावर डॉ. श्रेयश मानगावे (आयशर पुणे) यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षकांसाठी श्री. अ. ल. देशमुख (भारती विद्यापीठ पुणे) यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' व 'विज्ञान शिक्षण' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

सदर कार्यक्रमाचा समारोप बुधवार दिनांक ८-२-२०२३ रोजी दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभासोबत संपन्न होईल तरी सदर शैक्षणिक उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर व अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार चे प्राचार्य श्री. वाय. आर. गुरव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment