कोल्हापूर / प्रतिनिधी
कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने वयाच्या 2 वर्षे 11 महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे सर केल्याने तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद झालेली आहे.ती कसळसूबाई शिखर सर करणारी देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.
त्याचप्रमाणे तिच्या ह्या कामगिरीची वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी ने दखल घेऊन 8 जानेवारी रोजी "YOUNGEST MOUNTAINEER "हा किताब देणार असल्याची घोषणा केली होती.कम्युनिटीची टीम कोल्हापुरात अलेली होती.
मेरी वेदर ग्राउंडवर आयोजीत कार्यक्रमामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी चे अध्यक्ष यशवंत राऊत यांचे कडून कु.अन्वी हिला ट्रॉफी, सर्टिफिकेट , टी-शर्ट,देऊन एंगेस्ट माऊंटनर हा किताब देऊन सन्मानित केले.
अन्वीने वयाच्या 2 ऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई भर पावसात अवघ्या 3 तासात चढाई करत जागतिक विक्रम नोंदविला आहे. अतिशय लहान वयामध्ये मोठ्या स्वप्नांची चढाई करण्याचा ध्यास घेणाऱ्या अन्वीचा आम्हास सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. तिच्या कर्तृत्वास मानाचा सलाम आहे.असे उद्गगार खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमाच्या वेळी काढले.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, प्राचार्य शाहू कॉलेज डॉ. विलास किल्लेदार विविध कॉलेजचे प्राचार्य ,पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक,अन्वीची आई अनिता घाटगे,वडील चेतन घाटगे,हे उपस्थित होते.
फोटो
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अध्यक्ष यशवंत राऊत यांचे कडून कु.अन्वी हिला ट्रॉफी, सर्टिफिकेट , टी-शर्ट,देऊन एंगेस्ट माऊंटनर हा किताब देऊन सन्मानित करताना शेजारी आई अनितासह वडील चेतन घाटगे
No comments:
Post a Comment