कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक सहविचार मंच गटात सहभागी असणाऱ्या सर्व तालुक्यातील शाळांनी आपापल्या सहविचार मंचच्या केंद्र शाळेत आपल्या शाळेत जमा झालेले तुरडाळ, मुग, ताट, वाटी,ग्लास, साडी व वेस्टेज प्लास्टिक हे साहित्य जमा करावे. सर्व साहित्यांची शाळांनी नोंद स्वतंत्रपणे ठेवावी व याची माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती पाठवावी. प्रमुखांनी केंद्र शाळामध्ये जमा झालेले सर्व साहित्य केंद्रावरून मठावर देण्यासाठी किती गाड्या लागणार याची माहिती कळवावी म्हणजे गाडीची सोय करता येईल. शाळेतील मुले आपापल्या पालकांच्या बरोबर त्यांच्या जबाबदारीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास सांगावे. साहित्य घेऊन जाणाऱ्या गाडीवर माध्यमिक शाळेच्या नावाचा फलक लावावा. १० जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये साहित्य गोळा करून एकत्रित करावे आणि १५ फेब्रुवारी पर्यंत सर्व साहित्य मठामध्ये पोहचविण्यासाठी माध्यमिक शिक्षक सहविचार मंचाने प्रयत्नशील राहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.
मुख्याध्यापक संघ कोल्हापूरच्या
विद्याभवन सभागृहामध्ये सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक सहविचार सभेचे तालुका अध्यक्ष व अंतर्गत सहविचार मंचाच्या मुख्याध्यापकांची सभा आयोजित केली होती या प्रसंगी बोलत होते. या सभेस कोल्हापूर जिल्हयातील बारा तालुक्याचे सहविचार सभेचे तालुका अध्यक्ष व तालुका अंतर्गत सहविचार सभेचे सदस्य मुख्याध्यापक उपस्थित होते. स्वागत उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी केले.
माध्यमिक शिक्षक सहविचार मंच
कागल तालुका अध्यक्ष ए. आर. खामकर ७ सहविचार मंच , करवीर तालुका अध्यक्ष पी. टी. पाटील १० सहविचार मंच, भुदरगड तालुकाअध्यक्ष डी. एस. देसाई ४ सहविचार मंच , राधानगरी तालुका अध्यक्ष एस. के. पाटील ६ सहविचार मंच, हातकणंगले तालुका अध्यक्ष बी. डी. शिंदे १६ सहविचार मंच, पन्हाळा तालुका अध्यक्ष एस. आर. पाटील १० सहविचार मंच, शाहुवाडी तालुका अध्यक्ष दीपक लाड ६ सहविचार मंच, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष राजेंद्र खोराटे १० सहविचार मंच,
आजरा तालुका अध्यक्ष एस. एस. देवेकर ३ सहविचार मंच , शिरोळ तालुका अध्यक्षा आर. आर. निर्मळे ६ सहविचार मंच, कोल्हापूर शहर अध्यक्ष बी. सी. वस्त्रत ९ सहविचार मंच,चंदगड तालुका अध्यक्ष विश्वास पाटील ९ सहविचार मंच,गगनबावडा तालुका अध्यक्ष व्ही. डी. पाटील १ सहविचार मंच आदी सहविचार मंचांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
या सभेस शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघ चेअरमन सुरेश संकपाळ, खंडेराव जगदाळे,उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील, पुनम ठमके, बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक अर्जुन होणगेकर, सुधाकर निर्मळे,इरफान अन्सारी, मुख्याध्यापिका वंदना डेळेकर, काकासाहेब भोकरे,मिलींद बारवडे, के. के. पाटील, आर.वाय. पाटील, के. एस. पाटील,मिलींद पांगिरेकर, व्ही. जी. पोवार,अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाचे अध्यक्ष / सचिवसह सहविचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment