कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकिच्या कामासाठी ज्या ज्या मुख्याध्यापक,शिक्षक व इतर सेवक यांना नियुक्तिचे आदेश दिलेले होते ते सर्व आदेश विविध परीक्षेच्या कारणाने रद्द करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी पत्र देवून घेतल्याची माहिती ,शिक्षक आमदार जयंत
आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या आज मुख्याध्यापक संघाच्या विदयाभवन येथील सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड हे होते.
विविध परीक्षांच्या काळात वरील सहकारी कारखान्याच्या दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकिच्या कामाबाबत कागल, पन्हाळा, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातीला व कोल्हापूर शहरातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांना आदेश देण्यात आले होते . दि१२ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षां असल्याने तसेच आगामी इ१०वी व १२ वी बोर्ड परीक्षेची कामे असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. शैक्षणिक व्यासपीठाकडे असंख्य तक्रारी आल्या होत्या. या प्रश्नासंबंधी शैक्षणिक व्यासपीठाने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना भेटून या प्रश्नाची माहिती दिली. त्वरीत आमदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेवून सदरचे आदेश रद्द करावेत अशी विनंती केली होती.आज विद्या भवन येथे शैक्षणिक व्यासपीठाने सदरच्या निवडणूकीचे आदेश प्राप्त झालेल्या सर्वांची सभा घेण्यात आली. या सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वरील निर्णय आमदारांनी सांगितला .
सार्वत्रिक निवडणूका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूकांच्या कामाशिवाय सहकार क्षेत्रातील कोणत्याही निवडणूकीचे काम शिक्षक, मुख्याध्यापक यांना देवू नये म्हणून फेब्रुवारी महिन्यातच या मागणीसाठी जिल्हयातील सर्व शाळा एक दिवस बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आमदारांनी घोषित केला व त्याला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला.
आजच्या सभेला बी. जी. बोराडे, दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, बाबा पाटील, इरफान अन्सारी, प्रा.सी. एम. गायकवाड, उदय पाटील, सुधाकर निर्मळे, अरुण मुजुमदार, सुधाकर सावंत, सुदेश जाधव, शिवाजी लोंडे, वर्षा पाटील, विजयमाला सुर्यवंशी आदी प्रमुख पदाधिकारीसह निवडणूक नियुकतीचे आदेश प्राप्त शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते. आभार मिलींद पांगिरेकर यांनी मानले.
फोटो
कोल्हापूर : शिक्षक आमदार जयंत आसगावकर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत बोलतांना शेजारी एस.डी.लाड, दादासाहेब लाड,बी. जी. बोराडे, प्रा. सी.एम. गायकवाड, राजाराम वरुटे आदीसह अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment