Monday, 13 February 2023

चोकाक गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या अभ्यासिकेचा अनोखा उपक्रम


हेरले / प्रतिनिधी
चोकाक ( ता.हातकणंगले) येथे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी चोकाक ग्रामपंचायत व गावातील शिक्षकांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या अभ्यासिका चे नियोजन करण्याचे योजना गावांमध्ये राबवली आहे, या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचाही भरघोस असा प्रतिसाद लाभत आहे, सायंकाळचा वेळ विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ मोबाईल व टीव्ही यामध्ये व्यस्त असतात त्यामधून बाहेर पडून त्यांनी अभ्यास करावा, या उद्देशाने चोकाक  गावांमध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ गावातील प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या साठी अभ्यासिकेचे नियोजन करण्यात आले या अभ्यासिकेसाठी गावातील सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत, सरपंच शरद चोकाककर व उपसरपंच प्रवीण माळी दोघेही शिक्षक असल्याने ही अनोखी योजना समोर आली व गावातील सर्व शिक्षकांनी लगेचच या उपक्रमास होकार दिल्याने अतिशय उत्साहात व विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसदमध्ये ही अभ्यासिका सुरू आहे यासाठी गावातील सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने अभ्यासिकेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत या उपक्रमाचे गावामध्ये सगळीकडे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment