Monday, 20 March 2023

श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था हेरलेच्या पंचवार्षिक निवडणूकीत दुरंगी काटा लढत



   हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील 
श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेसाठी  १३ जागांसाठी दुरंगी लढत होत आहे.संस्थेसाठी मतदानास पात्र सभासद ६२५ आहेत. या निवडणुकीसाठी २६ मार्च रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल आहे.
   गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती राजेश पाटील यांनी  १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. तर विरोधी जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या गटास ३ जागा मिळाल्या होत्या. 
     माजी सभापती राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार - राजेश पाटील, उदय चौगुले, कपिल भोसले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, अशोक मुंडे, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील आदी उमेदवार आहेत. या आघाडीस शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.
      जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार आदगोंडा पाटील, अशोक इंगळे, महावीर चौगुले, अर्जुन पाटील, प्रकाश पाटील, भुजगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, कृष्णा हवालदार, गोविंद आवळे, भगवान कोळेकर, रियाज जमादार, संगीता उपाध्ये, सुप्रिया चौगुले आदी उमेदवार आहेत. या आघाडीस कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
   दोन्ही आघाड्यांनी अर्ज दाखल केल्यापासूनच प्रचारास सुरुवात केली आहे. यामुळे निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे.ही निवडणूक अटीतटीची काटा लढत होत असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment