हेरले / प्रतिनिधी
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय ) पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षपदी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. प्रवीर सिन्हा यांची आणि उपाध्यक्षपदी व्ही एम सालगावकर आणि ब्रदर प्रायव्हेट लिमिटेड च्या अध्यक्ष श्रीमती स्वाती सालगावकर यांची निवड करण्यात आली. सन २०२३ - २४ या वर्षासाठी ही निवड झाली आहे. आज झालेल्या सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
वर्ष २०२३-२४ साठी सीआयआय पश्चिम क्षेत्रातील भारतीय व्यवसायांसाठीची थीम जागतिकीकरणाचा पुढील टप्पा आहे. लवचिक जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सर्वसमावेशक मूल्य साखळी हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कार्य, कौशल्य आणि गतिशीलतांचे भविष्य, डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी वित्तपुरवठा, आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ऊर्जा, हवामान बदल आणि संसाधन कार्यक्षमता, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि संशोधन आणि विकास या प्रमुख बाबींवर सीआयआय पश्चिम विभाग कार्य करणार आहे.
यावेळी संजीव बजाज सीआयआय, राष्ट्रीय अध्येक्ष. श्री सुनील चोरडिया सीआयआय पश्चिम विभागाचे मावळते चेअरमन. श्री मधुर बजाज सीआयआय पश्चिम विभागाचे माझी चेअरमन.श्री प्रवीर सिन्हा सीआयआय पश्चिम विभागाचे चेअरमन.
श्रीमती स्वाती सालगावकर सीआयआय पश्चिम विभागाचे व्हॉइस चेअर पर्सन.श्री सोहन शिरगावकर चेअरमन दक्षिण महाराष्ट्र झोन. श्री अजय सप्रे व्हॉइस चेअरमन दक्षिण महाराष्ट्र झोन.श्री रवी डोली महाराष्ट्र स्टेट कौन्सिल सदस्य
इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment