Wednesday, 19 April 2023

विद्यार्थ्यांनी कष्टाचे सातत्य कायम राखावे-- -- शंकर यादव


कोल्हापूर दिनांक- 19 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, अभ्यास व सराव केला. तसाच अभ्यास आपण जीवनभर करत रहा असा सल्ला प्रशासनाधिकारी श्री शंकर यादव यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गुणगौरव व सत्कार समारंभ प्रसंगी  आव्हान केले. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी स्थान प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकांचा तसेच विविध गुणवंत सभासदांचा सत्कार यावेळी शाहू स्मारक भवन येथे करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे सभापती उमर जमादार होते.
 श्री यादव पुढे म्हणाले, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांच्या लौकिकात भर घातलेली आहे. गुणवत्तेमध्ये राज्यांमध्ये महापालिका प्रथम स्थानी असून सातत्याने दरवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत आहे .अनेक शाळांच्या मध्ये शिक्षक सुट्टी न घेता सातत्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि सराव घेत आहेत त्यामुळे हे यश मिळाले असून याचा परिणाम महापालिकेच्या शाळा त्यामध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यास झालेला आहे. हे अभ्यासाचे सातत्य विद्यार्थ्यांनी कायम राखावी व भविष्यामध्ये आपलं नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन त्यांनी केले व पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले त्याबद्दल सर्व संचालकांना धन्यवाद दिले. यावेळी पतसंस्थेच्या कामाचा आढावा तसेच पतसंस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहिती सुधाकर सावंत यांनी दिली .यावेळी सभासदांच्या पाल्यांचा व गुणवंत सभासदांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय पाटील, वसंत आडके, राजेंद्र गेजगे, लक्ष्मण पवार ,भारती सूर्यवंशी ,मनीषा पांचाळ, विजय माळी,  नेताजी फराकटे,प्रभाकर लोखंडे, प्रदीप पाटील, सुनील नाईक, उमेश देसाई, मंजीत भोसले, संजय कडगावे , उत्तम कुंभार सुनील पाटील आदि संचालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन उपसभापती कुलदीप जठार यांनी मांडले सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे व स्वाती खाडे यांनी केले.

No comments:

Post a Comment