Thursday, 20 April 2023

मौजे वडगांव येथे सुतार पाणंद रस्त्याचा शुभारंभ


हेरले ( प्रतिनिधी )

 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गावविहिरी कडून जाणाऱ्या सुतार पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच कस्तुरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
          गावातील सुतार पाणंद रस्ता प्रचंड खराब झाला होता. त्या रस्त्यावरिल शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. याबाबत त्या परिसरातील शेतकऱ्यानी व ग्रामपंचायतींच्या वतीने माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे पाणंद रस्ता दुरुस्ती साठी निधी मागितला होता. माजी आमदार अमल महाडिक यांनी निधी देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. त्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर या पाणंद रस्त्यासाठी १० लाखाचा निधी दिला असून या रस्त्याचा शुभारंभ सरपंच कस्तूरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी सरपंच रावसो चोगुले, दत्त सोसायटीचे माजी चेअरमन श्रीकांत सावंत, हनुमान दुध संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत , यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पाणंद रस्त्यांचा शुभारंभ झाल्याने त्या परिसरातील शेतकऱ्याच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.
             यावेळी माजी सरपंच सतिशकुमार चौगुले , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रां. प . सदस्य सुरेश काबरे, रघूनाथ गोरड , स्वप्नील चौगुले, सविता सावंत, दिपाली तराळ , सुनिता मोरे, अविनाश पाटील , प्रकाश चौगुले, जयसिंग चौगले , देवगोडा पाटील, आदगोंड पाटील , मधुकर आकिवाटे, यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
सुतार पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच , उपसरपंच , विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर

No comments:

Post a Comment