डॉ अजितकुमार पाटील.( पीएच डी ,मराठी साहित्य )
संस्कृती आणि समाज हे मानवतेच्या विकासाचे दोन स्तंभ आहेत. मानव हा एक समाजशील प्राणी आहे. समाजाअभावी त्याचे जीवन व विकास याची कल्पनाच येत नाही. संस्कृती हे व्यक्तीचे जीवन उन्नत करण्याचे एक साधन आहे.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे संस्कार केले जातात त्यालाच संस्कृती म्हणतात. "संस्कृती ही जीवन जगण्याची एक पद्धत आहे. शेकडो वर्षापासून तिचा समाजावर प्रभाव आहे. ज्या समाजात आपण जन्म घेतो ,ज्या समाजात व्यस्त रहाते, त्या समाजाची संस्कृती हीच व्यक्तीची संस्कृती असते.
टायलरच्या मते, " सर्व व्यवहार प्रतिमानांच्या समग्रतेला संस्कृती म्हणतात. संस्कृती हा सामाजिक आविष्काराचा अभिनव परिणाम आहे. "
संस्कृती ही काही स्थिर वस्तू नसून एक निरंतर विकास पावणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या मान्यता, मानवतावादी आदर्श, मूल्यांचे संघटन आहे. वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनांना आत्मसात करीत तिचा प्रवाह चालू असतो. संस्कृतीच्या या प्रवाहाला रोखणे हास्यास्पद ठरेल. आज जग सतत बदलत आहे.कारण हे विज्ञान युग आहे. परिवर्तनापासून समाज दूर राहू शकत नाही. संस्कृती सदैव नवी सभ्यता आणि नव्या मान्यतांच्या शोधात असते. समाज बदलत असतो. ज्या समाजाने या बदलांची अपेक्षा केली त्यांचे पतन झाले याला इतिहास साक्षीदार आहे. संस्कृती आपणास उदार करते. आंतरिक शक्तीला जागृत करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन देते. ती आपणास सर्व मानवतावादी गुणांना स्वीकारण्याची प्रेरणा देते. ज्यामुळे आपण श्रेष्ठ जीवन जगू शकू, परोपकार करू शकू, शांती मिळवू शकू. धर्माप्रमाणे आचरण करु शकू या संस्कृतीचा स्वीकार करूनच आपण सुसंस्कृत व भारताचा आदर्श नागरिक बनू शकतो.
संस्कृती आणि समाज परस्परावलंबी असतात. संस्कृतीनुसारच समाजाची जीवनशैली विकसित होते. जर समाज उन्नत झाला तर संस्कृतीची ध्वजा फडकेल. जर समाज पडला तर संस्कृती लुप्त होईल. तिचे नामोनिशाणही राहणार नाही. म्हणूनच संस्कृतील समाजाचा अंतरात्मा मारले जाते. संस्कृतीची निर्मिती शेकडो युगांच्या प्रक्रियेनंतर होत असते. मानव जी काही आध्यात्मिक, वैज्ञानिक,सामाजिक, भौतिक,सांस्कृतिक, तात्त्विक प्रगती करतो त्याचा सबंध आपल्या संस्कृतीशी असतो. प्राचीन काळापासून आपण जी जीवनपद्धती स्वीकारली आहे.ती जीवनशैली मानवाच्या विकासाचा परिचय करून देणारी ठरत असते.म्हणून भारतीय संस्कृती ही जिवंत संस्कृत आहे. ती अजरामर आहे. ती सतत निरंतर चालत राहण्याचा संदेश देते. आपण आपल्या प्राचीन परंपराही सोडल्या नाहीत व आधुनिकतेच्या उपयुक्ततेलाही नाकारले नाही.म्हणजे च आपण व आपले विचार हे राष्ट्र घडविण्यासाठी, देश प्रगती करण्यासाठी सतत झटत असतो.
समाज आणि संस्कृती दोन्ही मानवासाठीच आहेत. दोन्ही मिळूनच परिपूर्णत करू शकतील व आजच मानवी परिपूर्ण बनेल, दोघांच्या समन्वयाच्या प्रयत्ना एक असा भारत बहुजन हिताय बहुजन सुखाय'चा
विवेकी संदेश मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजाला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
जय हिंद !
डॉ अजितकुमार पाटील,
) पीएच डी मराठी साहित्य )
No comments:
Post a Comment