हेरले /प्रतिनिधी
जेईई परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या 24 विद्यार्थ्यांनी 99 पसे॔टाईल पेक्षा अधिक गुण मिळवून उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
तनिष्क चिरमे(99.97)भक्ती पाटील (99.97)शिवतेज घाटगे(99.82) हर्षल पाटील(99.79) शिवानी साळुंखे(99.69) दुर्वेश गांगवा(99.68) शंतनु बेनके(99.68) युवराज पवार(99.68) आदित्य बोराटे(99.66) मिहीर सहस्त्रबुद्धे(99.65) स्वातम दोशी(99.64) राजवर्धन रेपे (99.51)वैष्णवी मोरे(99.40) प्रणाली पाटील(99.31) श्रेयांक शहा(99.21) शुभम पाटील(99.20) श्रुतम दोशी(99.18) राजवी शहा (99.17)चारुता कराड (99.14)प्रणव मगदूम(99.09) यश शहा(99.06) वेदांत जाधव(99.00) या विद्यार्थ्यांनी 99 पसे॔टाईल पेक्षा अधिक गुण मिळविले. तसेच अकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी फिजिक्स व एका विद्यार्थ्याने मॅथ्स आणि एका विद्यार्थ्याने केमिस्ट्री मध्ये अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. घोडावत अकॅडमीने सातत्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले आहे.
अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अकॅडमीचे संचालक श्रीनिवास (वासू) कोंडूती सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
याबद्दल बोलताना संचालक श्री वासू म्हणाले,की आयुष्यात ध्येय निश्चित असेल तर आत्मविश्वासाने जिद्दीच्या बळावर कोणतेही यश आपण प्राप्त करू शकतो. हेच या निकालावरून दिसून येते.
No comments:
Post a Comment