हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील गौस हजारी ते स्वामी समर्थ केंद्रापर्यंतचा मुख्य रस्ता तात्काळ करावा आशा मागणीचे पत्र माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिफारस पत्राद्वारे ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
सांगली कोल्हापूर फाट्याकडून व मौजे वडगावातून पेठ वडगावकडे जाणारा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग असणारा गौस हजारी ते स्वामी समर्थ मंदिरा पर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो तात्काळ करण्यात यावा . सदरचा रस्ता तीन मीटर रुंदीचा डांबरीकरण न करता. तो दोन्ही साईटच्या गटारी पर्यंत सिमेंट कॉक्रिटचा करणेत यावा. सदरचा मुख्य रस्ता असलेने ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर , मुरुमाचे अवजड डंपर , आशा विविध अवजड वाहनासह इतर मोठी वाहने पेठ वडगांवकडे ये - जा करत असतात. सदरच्या रस्त्यावर गावातील रस्त्यालगतचे रहिवाशी असणाऱ्या ग्रमस्थांची खाजगी वाहने रस्त्यावर पार्किंग करत आसल्याने इतर वाहनांना ये -जा करणे जिकिरीचे होऊन ट्रॉपिक जाम होते. व वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे हा रस्ता दोन्ही साईटच्या गटारी पर्यंत रुंदीकरण करून कॉक्रिटचा करणेत यावा.
या शिष्टमंडाळात उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, माजी ग्रा. पं . सदस्य अविनाश पाटील , ग्रा. प . सदस्य रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले , सामाजिक कार्यकर्ते अमोल झांबरे , यांचा समावेश आहे.
फोटो
गावातील मुख्य रस्ता तात्काळ व्हावा या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देतांना ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ
No comments:
Post a Comment