Thursday, 1 June 2023

नागपूर रत्नागिरी रस्त्यावर हेरले येथे भुयारी मार्ग करावा....

हेरले / प्रतिनिधी

नागपूर रत्नागिरी  नवीन राष्ट्रीय महामार्गाचे  काम सुरू आहे.पण हा रस्ता करत असताना शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता काम सुरू असून  हेरले (ता. हातकणंगले) सिद्धेश्वर डोंगराकडे जाणाऱ्या एक हजार एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना भुयारी मार्ग करावा अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे. 
           याबाबत अधिक माहिती अशी की हेरले गावातील बहुतांशी लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.  हेरले येथील सिद्धेश्वर डोंगर परिसरातून एक हजार हून अधिक क्षेत्रात ऊसाची शेती केली जाते.  सध्या नवीन  नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. हेरले येथील असंख्य शेतकऱ्यांच्या पीकाऊ उत्तम दर्जाच्या शेतजमिनी रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्याच्या कामासाठी कोणतीही अडचण केलेली नाही.  पण सध्या या नवीन राष्ट्रीय महामार्गा च्या उत्तरेला एक हजार एकर शेती पीकाऊ स्वरूपाची आहे.मसोबा मंदिर छत्री पाव ओढ्यातून सिद्धेश्वर डोंगराकडे जाणाऱ्या मुख्य  रस्त्यावर उत्तरेकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करावा.  जेणेकरून ऊस वाहतूक सह शेतकऱ्यांना इजा न होता सुरक्षित मार्ग तयार होईल. पण या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यानी शेतकऱ्यांच्या अडचणी न पाहता एक कलमी कार्यक्रम राबवला आहे.  अधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना उत्तरेकडे जाण्यासाठी आपला, व आपल्या जनावरांचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागणार आहे. असा धोकादायक प्रवास करणे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या जीवावर उठू शकतो.  त्यासाठी या रस्त्यावर उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठ्या स्वरूपात भुयारी मार्ग करावा अशी मागणी हेरले गावातील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे.

फोटो:-हेरले येथे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना

प्रतिक्रिया

 विजय कारंडे....
 सिद्धेश्वर डोंगर परिसरात 1000 एकर क्षेत्र  शेतीचे असून बहुतांशी क्षेत्रात उसाची शेती केली जाते. ऊस वाहतुकीसह  जनावरांनाही  घेऊन  महामार्गावरून रस्ता ओलांडणे  धोक्याचे आहे  तरी शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा  आणि भुयारी मार्ग तयार करून द्यावा

No comments:

Post a Comment