हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता.हातकणंगले) ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायतीने ठराव करून या ठरावानुसार लेखी निवेदन ईमेल द्वारे पाठवून मागणी केली आहे. सदर मागणीच्या निवेदनाची प्रत नामदार दिपक केसरकर यांना दिली आहे.
ग्रामपंचायत हेरलेने विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणेसाठी केलेला ठराव पुढील प्रमाणे आहे. मासिक सभा क्र.२ दिनांक २४/०५/२०२३ ठराव क्रमांक ०७
चा करणा पुरता उतारा.विषय नं.७ सरपंच यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणे बाबत. ठराव नं. ७ गावातील नागरिकांना शासकीय निमशासकीय शैक्षणिक व इतर काम योजना करत असत त्यांना त्यांचे कागद पत्रांची खरी प्रत करून घ्यावी लागते. खरी प्रत शिवाय कार्यालयीन कामकाज पूर्ण होत नाही. यामुळे नागरिकांना खरी प्रत घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो व इतरत्र हेलपाटे माराव्या लागतात. त्यामुळे
सरपंच हे लोकनियुक्त असलेने गावाचा गावगाडा ओढत असलेने त्यांना गाव परिचित असते. त्यामुळे त्यांना खरी प्रत करून देण्याचा अधिकार देण्यात यावा. "विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळावे यासाठी या ठरावाने तशी मागणी करण्यात यावी. या ठरावाचे सूचक अमित आदगोंडा पाटील, अनुमोदक सौ. सविता बाळगोंडा पाटील असून
सर्वानुमते हा ठराव मंजुर झाला असून सरपंच राहुल शेटे व ग्रामविकास अधिकारी बी.एस. कांबळे यांच्या या ठरावावर सहया आहेत.
No comments:
Post a Comment