पेठ वडगाव / प्रतिनिधी
वडगाव विद्यालय (ज्युनि. कॉलेज व तत्र शाखा) वडगाव (ता. हातकणंगले) चा सन - २०२२ -२३ एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.१३% लागला. या परीक्षेस एकूण बसलेले विद्यार्थी १६१,उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - १५८ आहेत.
गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक
प्रथम क्रमांक - कु. श्रध्दा मुरलीधर पाटील (९९.००% ),द्वितीय क्रमांक कु. आर्या सचिन गुरव ( ९८.४०% ) तृतीय क्रमांक - कु. भक्ती अजित लाड (९४.२०% )
टेक्निकल विषयाचा निकाल १००% लागला आहे.संस्कृत विषयाचा निकाल १००% व सेमी माध्यमचा ही निकाल १००% लागला आहे.
टेक्निकल विभागात प्रथम क्रमांक
कु. विद्या शामराव भातडे (८६.००%)
मागासवर्गीयात प्रथम क्रमांक कु. अंजनी सचितानंद आवळे ( ८६.६०% ) या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे, सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई , उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन प्रा. डॉ.मंजिरी देसाई मोरे , युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, कौन्सिल मेंबर मुख्याधापक बाळ डेळेकर, माजी मुख्याध्यापक डी.के .पाटील,उपमुखाध्यापक एस.डी.माने , पर्यवेक्षिका सौ. आर.आर पाटील , तंत्र विभाग प्रमुख ए .एस .आंबी , मुख्य लिपिक .के.बी. वाघमोडे परीक्षा विभाग प्रमुख डी. एस. शेळके, जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार, मिलींद बारवडे आदी मान्यवरांसह वर्गशिक्षक , विषय शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या वर्षी ही दहावी निकालाची उज्वल परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने विद्यार्थी ,
पालकवर्ग, माजी विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment