Wednesday, 5 July 2023

मौजे वडगांव बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करा


हेरले / प्रतिनिधी 
 मौजे वडगांव येथील बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करावा आशा मागणीचे पत्र उपसरंपच सुनिल खारेपाटणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना दिले.
          नागपूर रत्नागिरी नविन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पण हा रस्ता करत असतांना शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता काम सुरु आसून मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील बारकी पाणंद म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व  गावातील सातशे ते आठशे एकर क्षेत्र असणाऱ्यां शेतकर्ऱ्याना या पाणंद रस्त्यांचा वापर वारंवार करण्यात येत आहे . त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करावा आशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
               अधिक माहिती अशी की, मौजे वडगावातील बहुतांश जमिनी या रस्त्यांमध्ये गेल्या आहेत रस्त्यांसाठी गावातील कोणीही अडचण केली नाही. गावाच्या गायराण व पाझर तलावाकडे जातांना गावातील शेतकरी जनावरे चरणेसाठी व पाणी पिण्यासाठी जातांना याच पाणंद रस्त्यांचा वापर करावा लागतो , तसेच गेल इंडिया , एचपीसीएल ' बीपीसीएल ' यासारखे शासनाचे मोठे प्रोजेक्ट गायराण मध्ये आसत्याने जाणेयेणे साठी याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. ऊस वाहतूक व जनावरांचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागणार आहे. असा धोकादायक प्रवास करणे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या जिवावर उठू शकते त्यासाठी गावातील शेतकऱ्यांसाठी हा भुयारी मार्ग करावा अशी मागणी मौजे वडगाव  गावातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळामध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे, , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड. अमोल झांबरे , उपस्थित होते.

  फोटो 
मौजे वडगाव  गावातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने उपसरपंच सुनिल खारेपाटणे लेखी निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना देतांना
शेजारी सुरेश कांबरे, , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड. अमोल झांबरे आदी मान्यवर

No comments:

Post a Comment