Wednesday, 5 July 2023

जिल्हा बदलून येणारे शिक्षकांना कोल्हापूर महापालिकेकडे सामावून घ्यावे - - प्राथमिक शिक्षक समितीची मागणी



 कोल्हापूर प्रतिनिधी - 

कोल्हापूर महानगरपालिकेकडे सध्या चाळीसहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अन्य जिल्ह्यामधून कोल्हापूर महानगरपालिकेकडे येऊ इच्छिणाऱ्या जवळजवळ सतरा शिक्षकांचे प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावना मंजुरी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली. या शिक्षकांच्या मुळे महापालिकेकडे रिक्त असलेल्या काही जागा भरल्या जातील व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल अशी भूमिका शिक्षक समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी यांनी याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती शिक्षक समितीला दिली. शिक्षक समितीच्या वतीने आज भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये नपा/ मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई ,शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, सुभाष धादवड, वसंत आडके ,उत्तम कुंभार, नयना बडकस, संदीप सुतार, उमर जमादार ,शकील भेंडवडे, कुलदीप जठार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment