हेरले / प्रतिनिधी
हेरले येथे सुरू करण्यात आलेले वीज बिल भरणा केंद्र लोकोपयोगी उपक्रम आहे.या माध्यमातून जनतेला चांगली सोय मिळणार असल्याचे प्रतिपादन जवाहर पतसंस्थेचे चेअरमन डॉ सनतकुमार खोत यांनी केले.
यावेळी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.रुकडी शाखा हेरले येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते वीज बिल भरणा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
खोत पुढे म्हणाले,गेली ३५ वर्ष जवाहर पतसंस्थेने अव्याहात पणे ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे.तसेच हेरले सह ६ शाखेद्वारे ग्राहकांना चांगली सोय होणार आहे.
यावेळी माजी सभापती राजेश पाटील, सरपंच राहुल शेटे, कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे, संचालक सुदर्शन खोत, बाळासो लाटवडे, अबुबकर जमादार ,एकनाथ बसुगडे,जनरल मॅनेजर चंद्रकांत आंबले,मनोज हांडे, प्रकाश पाटील,तय्यबअली मुल्ला,अश्रफ खतीब व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:-हेरले (ता हातकणंगले) येथे जवाहर पतसंस्थेत वीज बिल भरणा केंद्रामध्ये पहिले वीज बिल भरल्यानंतर ग्राहक विजय पाटील यांना कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment