हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले)
गावचे माजी सरपंच पत्रकार, छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटी व हेरले महिला औद्योगिक सोसायटीचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय. बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या २७ व्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी फोटो पूजन सुरेंद्र कोरेगावे व श्रीफळ माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आले.
या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या स्वीकृत संचालक व सल्लागार पदी मुनिर जमादार,
रावसाहेब चौगुले,पांडुरंग चौगुले,संजय परमाज,सुकुमार कोळेकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार,लोकनियुक्त सरपंच राहूल शेटे छत्रपती सोसायटी चे चेअरमन अशोक मुंडे ,व्हाईस चेअरमन कपिल भोसले, माजी चेअरमन विद्यमान संचालक उदय चौगुले ,स्वप्नील कोळेकर,शशिकांत पाटील,सुनील खोचगे,कृष्णात खांबे, बंडू पाटील, सुकमार कोळेकर, शेतकरी सोसायटीचे संचालक शिवाजी कोळेकर,ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, अंबाजी कोळेकर दादासो कोळेकर , बाबासाहेब कोळेकर ,संग्रामसिंह रूईकर , अरविंद कोळेकर,आदी मान्यवरांसह सेक्रेटरी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
स्वर्गीय. बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या २७ व्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतांना माजी सभापती राजेश पाटील, स्वप्नील कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment