हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव येथील लघू पाटबंधारे अंतर्गत पाझर तलाव हा मौजे वडगांव साठी राखीव आहे. हा तलाव १९७२ मध्ये पूर्ण झाला असून त्यासाठी लागणारी जमीन गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे. सदरच्या पाझर तलावातून नागाव गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करूण नेणार असे मौजे वडगावातील ग्रामस्थांना समजल्या नंतर मौजे वडगाव ग्रामसभेमध्ये तीव्र विरोध करण्यात आला. व तसा ग्रामसभेचा ठराव करूण पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने नागाव व मौजे वडगाव या दोन्ही गांवाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सयुक्त बैठक बोलविण्यात आली.
या बैठकीमध्ये मौजे वडगावच्या पाझर तलावावर वडगावकरांचाच हक्क असून त्यांना पुरेसे झाल्यानंतर उरलेल्या पाणी साठ्यातून आम्हाला थोडे पाणी देऊन सहकार्य करावे अशी विनंती नागाव ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. परंतू मौजे वडगांव गावच्या भविष्यातील लोकसंख्या वाढीमुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे तलावातील एक थेंबही पाणी देणार नाही या मतावर मौजे वडगावकर ठाम राहिल्याने हि बैठक निष्फळ ठरली.
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे, माजी सरपंच सतिश चौगुले, ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड, नितिन घोरपडे, मनोहर चौगले, धोंडीराम चौगुले, जयवंत चौगुले, अविनाश पाटील, सदस्या सविता सावंत, सुवर्णा सुतार,अमोल झांबरे, सचिन चौगुले, संतोष अकिवाटे, अमर थोरवत, संतोष लोंढे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
सदर लघूपाटबंधारे तलाव हा आठमाही म्हणजे खरिब व रब्बी हंगामाकरिता सिंचनासाठी बांधलेलाआहे. त्यामुळे त्यातील पाणी कायमस्वरूपी उदभव आहे का हे जलजीवन मिशन योजना राबवितांना संबधीत अधिकाऱ्यांनी तपासून पहावे.
स्मिता माने
कार्यकारी अभियंता
पाटबंधारेविभागउत्तर
कोल्हापूर
फोटो
पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत मौजे वडगांव व नागाव ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना कार्यकारी अभियंता स्मिता माने मॅडम .
No comments:
Post a Comment