हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सह.पतसंस्था कोल्हापूरच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवड तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. संस्थेच्या चेअरमनपदी पदी वडगाव ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांची निवड झाली.सलग पाचव्यांदा चेअरमन पद मिळालेबद्दल वडगाव विद्यालयात कौन्सिल सदस्य प्राचार्य बाळ डेळेकर यांचा सत्कार उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे , पर्यवेक्षिका सौ. आर. आर.पाटील, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना नुतन चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले ' दादासाहेब लाड यांच्या आशिर्वादाने पाचव्यांदा संस्थेचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे.याचा मनस्वी आनंद होत आहे . माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष श्रीमती शिवानीताई देसाई,उपाध्यक्ष शिवाजी सावंत, सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य युवा नेते दौलत देसाई,चेअरमन सौ. मंजिरी मोरे देसाई यांचे बहुमोल सहकार्य व पाठबळ लाभले , तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू - भगिनी यांचे नेहमीच सहकार्य मिळाले . माझ्या जडणघडणीत माझ्या पत्नी सौ. वंदना जाधव - डेळेकर ( मुख्याध्यापिका प्रायव्हेट हाय . ) व परिवाराचे योगदान आहे .या प्रसंगी तंत्रविभाग प्रमुख ए. एस. आंबी , परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके जेष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार, काकासाहेब भोकरे, सुवर्णा चव्हाण, महेश कुलकर्णी, अकबर पन्हाळकर, अतुल पाटील आदी मान्यवरासह शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.
फोटो
वडगाव विद्यालय ज्यु. कॉलेज वडगावमध्ये नुतन चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर यांचा सत्कार करताना उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे पर्यवेक्षिका आर. आर. पाटील कार्यवाह के. बी. वाघमोडे आदीसह अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment