Thursday, 3 August 2023

हातकणंगले तालुका शालेय स्पर्धा नियोजन बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी
अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये हातकणंगले तालुका शालेय स्पर्धा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे म्हणाले की "कोल्हापूरचा अभिमान खेळ आमची शान" या घोषवाक्याच्या आधारे व Let's do it once, let's do it well या वृत्ती प्रमाणे आपण कार्य करून तालुकास्तरातील स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू. यावर्षी पाच राज्यस्तरीय स्पर्धा तर जवळजवळ (९०) नव्वद खेळ प्रकाराच्या खेळाच्या स्पर्धा घ्यावयाचे आहेत. आपल्या सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी करू.तसेच त्यांनी सांगितले की तालुका स्पर्धा आयोजित करत असताना आवश्यक ती दक्षता घ्यावी खेळाडूंना विशेषता मुलींना क्रीडांगणामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.  स्पर्धेचे आयोजन करताना प्रशासकीय यंत्रणेला सेवा यंत्रणा याविषयी कल्पना द्यावी जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही किंवा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडतील. क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंच्या आहाराविषयी व प्रवासाविषयी काळजी घ्यावी.तसेच स्पर्धा घेत असताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.स्पर्धा आयोजन करत असताना विनाकारण आयोजकांना खेळाडूंना त्रास देणाऱ्या व्यक्तींवरती क्रीडा विभागाकडून व शासकीय यंत्रणे कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.यावेळी व्यायाम शाळा अनुदान व विकास अनुदान अशा शासकीय योजनांचा  लाभ घ्यावा. राज्य शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेच्या मार्फत शासनाकडून 90 लाखाचे अनुदानाची तरतूद आहे. अशा शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केला.
यावेळी हातकणंगले तालुका समन्वयकांची निवड व सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे,क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी क्रीडा अधिकारी,मनीषा पाटील, डेटा ऑपरेटर गौरव खामकर व संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीचे स्वागत प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील आभार संताजी भोसले यांनी मानले.

No comments:

Post a Comment