हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोलीत शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण भारत देशात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या रथाचे शिरोली फाट्यावर आगमण झाले. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शिरोली चे माजी उपसरपंच कृष्णात करपे,ह .भ.प विठ्ठल पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील आदींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
हिंदू साम्राज्य निर्माते, सनातन हिंदू धर्माचे रक्षक, संवर्धक, राष्ट्रीय प्रेरणेचे अखंड स्रोत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे हे ३५० वे वर्ष. आपल्या धर्मशील आचरणाने, राष्ट्रीय विचाराने, प्रेरक कृतीने, जगभरातील हिंदूंना गेली साडेतीनशे वर्ष स्वातंत्र्याची अव्यहात ऊर्जा प्रदान करणाऱ्या छत्रपती श्री. शिवरायांच्या शौर्याचे स्मरण करणारे, त्यांच्या तेजस्वी पराक्रमाचे जागरण करणारे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे वर्ष.
श्री शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी जागतिक हिंदूंचे बलशाली संघटन असणारी विश्व हिंदू परिषद यावर्षी आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. हिंदुत्वाचा हुंकार जागवणाऱ्या या दोन अमृतयोगी घटनांद्वारे पुन्हा एकदा समाजाचे जागरण करण्यासाठी, हिंदूंच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी, राष्ट्र जागरण कार्यात हिंदू तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी, सनातन हिंदू धर्म रक्षणासाठी संपूर्ण भारत देशात विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण ही शौर्य यात्रा पुलाची शिरोली येथील शिरोली फाटा येथे सकाळी नऊ वाजता यात्रा रथ आला असता या रथाचे व यात्रेचे स्वागत संभाजी उर्फ बंडा साळुंखे, गणेशजी शास्त्री, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शिरोली चे माजी उपसरपंच कृष्णात करपे,ह .भ.प विठ्ठल पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील आणि इतर मान्यवरांनी श्रीफळ वाढवून स्वागत केले. त्यानंतर रथामधील सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र म्हणून शिरोली फाटा येथून शौर्य यात्रेस प्रारंभ करण्यात आला या शौर्य यात्रेचे मुख्य आकर्षण क्रांतीवीर ढोल ताशा पथक बजरंग दल व अण्णाभाऊ साठे मातंग समाजातील तरुणी व माता-भगिनीनी आरती करून जंगी स्वागत केले. हि यात्रा शिरोलीच्या मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे मार्गक्रमण करत असताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आतिषबाजी व पुष्पव्रूष्टी केली. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे यात्रा येताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रथावरती जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली. तेथून शौर्य यात्रा रथ ग्रामपंचायत चौकामध्ये आल्यानंतर ग्रामपंचायत समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती व ध्येय मंत्र म्हणल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ करण्यात आली.
.संभाजी उर्फ बंडा साळुंखे ,गणेश शास्त्री ,सोमेश्वर वाघमोडे, सुजित कांबळे, मुकुंद उरुणकर ,भास्कर अण्णा कोरवी शैलेश पवार,नियोजन समितीसदस्य प्रशांत कागले ,निलेश शिंदे, श्रीकांत कदम. मयुर मोरबाळे. शुभम पाटील. ओंकार चव्हाण. राहुल मोरे. अजय मेनीकरे. अभिषेक सुर्यवंशी. हर्षद देशपांडे, बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, राजेश पाटील, आण्णासाहेब सावंत, दिपक यादव, योगेश खवरे, धनाजी पाटील, विनोद आंची, शिरोली ग्रामपंचायत चे सर्व सदस्य कर्मचारी शिरोली एमआयडीसी पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करताना हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी.
No comments:
Post a Comment