.
कोल्हापूर दिनांक - 9 .माणसाने आपल्या अंगी उत्कृष्ट अशी वक्तृत्व कला विकसित करावी. वक्तृत्व कलेमुळेच मनुष्य उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांनी ही कला आत्मसात करावी असे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शहरस्तरीय इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे नपा / मनपा राज्यप्रमुख सुधाकर सावंत होते. डॉ. लवटे सर पुढे म्हणाले, 'लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्यात वक्तृत्व कलेची आवड निर्माण करावी. आज संभाषण कौशल्यामुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या करून सांगता येतात. उत्कृष्ट संभाषण कला अंगी असल्यामुळे अनेक जणानी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या अंगी उत्कृष्ट अशी संभाषण कला जाणीवपूर्वक वाढवावी. इंग्लिश भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील भाषा आत्मसात होण्यासाठी चांगला उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षक समितीचे कौतुक केले.यावेळी सुधाकर सावंत यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हक्का बरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून विविध उपक्रम राबवत असते. आज पर्यंत अनेक आपत्तीच्या वेळी शिक्षक समितीने समाजाला मदत केल्याची माहिती दिली. त्याचबरोबर दरवर्षी गांधी जयंती निमित्त महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या साठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी इंग्लिश भाषेची गोडी निर्माण होण्यास मदत होत असल्याची माहिती दिली. यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांना शिवशाहू ट्रस्ट शाहुवाडी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल सत्कार करणेत आला.या वेळी शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी उमेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले तसेच नक्षत्र ग्राफिक्स चे डिझायनर श्रीपाद रामदासी हेही उपस्थित होते. यावेळी एकूण सात गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 314 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण चारुलता पाटील,अबोली देशपांडे ,श्रुती कुलकर्णी, अक्षय गुरव,शर्मिन कागदी, निशा साळवी,ज्योती देसाई,पुनम हिरेमठ, मानसी माने, सोमनाथ जाधव,सीमा हावळ,यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे कार्याध्यक्ष सुभाष धादवड कोषाध्यक्ष वसंत आडके महिला आघाडी प्रमुख अशालता कांजर,विठ्ठल दुर्गुळे, सुभाष माने, विनोदकुमार भोंग,सी एस पाटील, सुनील पाटील ,उत्तम कुंभार, उमर जमादार ,युवराज सरनाईक,तानाजी पाटील,कुलदीप जठार इत्यादींनी केले.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे*
*इयत्ता पहिली*
🥇 *प्रथम-* सर्वेशू ज्ञानेश्वर वागरे( लक्ष्मीबाई जरग विद्यालय)
🥈 *द्वितीय क्रमांक -* विहान तुषार भापकर(महात्मा फुले विद्यालय) ,
🥉 *तृतीय* अनुश्री शिवप्रसाद कळंत्रे (महात्मा फुले विद्यालय)
🏅 *उत्तेजनार्थ -*
अर्णव महेश कुंभार (राजे छत्रपती संभाजी विद्यालय)
🏅कुशल निलेश डोईफोडे( लक्ष्मीबाई जरग विद्या)
*इयत्ता दुसरी*
🥇 *प्रथम क्रमांक*: कुंजल सचिन देशमुख(जरग विद्या)
🥈*द्वितीय क्रमांक*: शौर्य रविकिरण सरदेसाई (राजे छत्रपती संभाजी विद्यालय)
🥉 *तृतीय क्रमांक*- विभागुन ओम सचिन कुंभार व अनविश जयवंत लोखंडे(जरग विद्या)
🏅उत्तेजनार्थ: अथर्व अमर चौगुले व हर्षाली विशाल कांबळे (जरग विद्या)
*इयत्ता तिसरी*
🥇प्रथम शांभवी संदीप देशपांडे
(जरगनगर)
🥈 *द्वितीय क्रमांक*: कार्तिकी यशवंत गव्हाणे
(विचारे विद्या)
🥈 *तृतीय क्रमांक*: स्वरा राजेंद्र रेपे (जरगनगर)
🏅उत्तेजनार्थ : कश्मीरा दौलत बारड
(जरग विद्या) जान्हवी नागराज गजाकोष( नेहरुनगर विद्या)
*इयत्ता चौथी*
🥇 *प्रथम क्रमांक* : संस्कार शहाजी पाटील (जरगनगर)
🥈 *द्वितीय क्रमांक* : आस्था महेश तूकारे(जरग विद्या )
🥉 *तृतीय क्रमांक* विभागुन : जान्हवी दीपक शिंदे (जरगनगर) स्वरा अरुण पाटील
🏅 *उत्तेजनार्थ -*
श्रेया संतोष आंबेकर( महात्मा फुले विद्यालय)
आराध्या संतोष जठार ( जरग विद्यालय)
*इयत्ता पाचवी*
🥇 *प्रथम क्रमांक* : स्वरांजली सुकुमार घाटगे (महात्मा फुले विद्यालय)
🥈 *द्वितीय क्रमांक* : परिणीती रवींद्र केकतपुरे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर ) 🥉 *तृतीय क्रमांक* - प्रणव जनार्दन ओंकार ( नेहरुनगर विद्यामंदिर ) 🏅 *उत्तेजनार्थ* - ग्रीष्म समित कदम (दत्ताजीराव माने विद्यालय) जुवेरिया हुसेन मुल्ला (लक्ष्मीबाई जरग विद्या)
*इयत्ता सहावी*
🥇 *प्रथम क्रमांक* : लावण्या मारुती कोराणे (लक्ष्मीबाई जरग विद्यालय)
🥈 *द्वितीय क्रमांक* : तनिष्का शरद पाटील (जरगनगर )
🥉 *तृतीय क्रमांक* विभागुन:आर्या दीपक चराटे (लक्ष्मीबाई जरग विद्या) व मसीरा उस्मानखान पठाण ( शाबाजखान आमिनखान जमादार उर्दू स्कूल)
🏅 *उत्तेजनार्थ*- राजवर्धन शशिकांत पाटील( लक्ष्मीबाई जरग विद्यालय)
तृप्ती प्रवीण भिसे ( टेंबलाईवाडी विद्यालय)
*इयत्ता सातवी*
🥇 *प्रथम क्रमांक* : श्रावणी प्रशांत मेधावी ,( महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी)
🥈 *द्वितीय क्रमांक*: समीक्षा संतोष अलुगडे (लक्ष्मीबाई जरग विद्यालय) 🥉 *तृतीय क्रमांक* - श्रेया प्रसाद हैबती (लक्ष्मीबाई जरग विद्यालय)
🏅 *उत्तेजनार्थ* : निलुफरहा गुलामसरवर अन्सारी( कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालय)
समृद्धि विजय केंद्रे (जरग विद्या)
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून चारुलता पाटील,अबोली देशपांडे ,श्रुती कुलकर्णी, अक्षय गुरव,शर्मिन कागदी, निशा साळवी,ज्योती देसाई,पुनम हिरेमठ, मानसी माने, सोमनाथ जाधव,सीमा हावळ,यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment