कोल्हापूर दि. 18
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी बुधवार दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर महापालिके समोरआंदोलन करण्यात येणार होते. तशी नोटीस प्रशासनाला दिली होती. आज अतिरिक्त आयुक्त मान.केशव जाधव यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समिती बरोबर बैठक घेऊन शिक्षकांची एन.पी.एस मध्ये खाती या महिना अखेरपर्यंत काढण्याच्या मागणीची पूर्तता करण्याचे मान्य केले. त्यामुळे शिक्षक समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.मुख्याध्यापक रिक्त जागा भरणे, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे व स्थायित्व प्रमाणपत्र देणे, विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे ,सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील फरक टप्प्याटप्प्याने देणे,दिव्यांग शिक्षकांना आरक्षणाचा लाभ देऊन पदोन्नती देणे, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक सुविधा देणे इत्यादी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली त्यातील काही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, प्रशासनाधिकारी शंकर यादव, शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्य प्रतिनिधी उमेश देसाई, शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, विनोदकुमार भोंग,मयूर जाधव, सुभाष धादवड, उमर जमादार, महिला आघाडी प्रमुख आशालता कांजर, राज्य प्रतिनिधी नयना बडकस,शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,उषा सरदेसाई ,विजय माळी, कार्यालयीन स्टाफ किरण रणसिंग, सौ.अंबुलगेकर अजय गोसावी,सूर्यकांत ढाले,शांताराम सुतार इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment