कोल्हापूर / प्रतिनिधी
आजचा विज्ञान युगात पारंपारिक संस्कृतीचे अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देणे आहे. पारंपारिक संस्कृतीचा वसा आणि वारसा उद्योन्मुख पिढीला माहिती व्हावा यासाठी शैक्षणिक संस्था मधुन पारंपारिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. असे प्रतिपादन प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या चेअरमन डॉक्टर मंजिरी देसाई मोरे यांनी केले.
आधुनिकता,विज्ञान आणि संस्कृती” यांची विण जपणारा “महिला सबलीकरण” हे उद्दिष्ट घेवून 35 वर्षे सुरू असणारा महाहादगा सहशालेय उपक्रम मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेज व सौ.सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना मंचच्या वतीने मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे आयोजित करण्यात आलेल्या महादगा बोळवण कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या यावेळी यावेळी सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील व प्राचार्य एस.आर.पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यालयातील 800 मुलींनी फेर धरून हादग्याची गाणी गायली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली
कार्यक्रमास उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी , पर्यवेक्षक एस.डी साठे , तंत्र विभाग प्रमुख पांडुरंग लोकरे, उपस्थित होते
सुत्रसंचालन विद्या सुर्यवंशी , कल्पना पाटील यांनी तर आभार. लता पाटील यांनी मानले
No comments:
Post a Comment