Friday, 24 November 2023

आ. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ) यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान तालिम मंडळाला तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे व सामाजिक कार्यकर्ते वृषभनाथ पाटील यांच्या पुढाकाराने वारणा विविध उदयोग समुहाचे नेते माजी मंत्री आ. डॉ. विनयरावजी कोरे यांनी तालमीत मल्लांना कुस्ती खेळण्यासाठी मोफत तांबडी माती देऊन बहुमोल सहकार्य केल्या बद्दल त्यांचा जय हनुमान तालीम मंडळ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
             मौजे वडगांव येथील जय हनुमान तालीम मंडळाची स्थापना २४ / १२ / १९७६ साली झाली . त्यावेळचे तात्कालीन ग्रामीण विकास व उद्योग राज्यमंत्री कै . उदयसिंहराव गायकवाड व जि. प . चे अध्यक्ष माजी खासदार कै . बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते उदघाटन होऊन सुरुवात झाली . त्यावेळी तालमीत लागणारी तांबडी माती स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी दिली होती . त्यानंतर तब्बल ४७ वर्षानंतर या तालमीत आ. डॉ. विनयरावजी कोरे यांनी मोफत तांबडी माती देऊन तरुण मल्लामध्ये कुस्ती खेळण्याचा उत्साह निर्माण केला आहे. सध्या जय हनुमान तालमी मध्ये २५ ते ३० मल्ल रोज नित्य नियमाने व्यायाम करत नवीन मऊ मातीमध्ये कुस्ती खेळून शड्डचा आवाज घुमवत आहेत .
           यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, पै. बाळासो थोरवत, वृषभनाथ पाटील, ग्रा.पं सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, अविनाश पाटील,संदिप खारेपाटणे, अमोल झांबरे, संदीप नलवडे,उपस्थित होते .

फॉटो 
आ. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ) यांचा सत्कार करतांना तालीम मंडळ व ग्रा पं सदस्य

No comments:

Post a Comment