ऑगस्त कॉम्त यांनी समाजशास्त्रात सर्वप्रथम " Sociology "हा शब्द प्रयोग प्रथम मांडला त्यामुळे यांना समाजशास्त्राचा जनक असे म्हणतात त्यांनी सामाजिक विज्ञान म्हणून 1839 मध्ये समाजशास्त्राची निर्मिती केली." समाजाचा सर्वांग पूर्ण अभ्यास करणारे जे शास्त्र ते समाजशास्त्र होय ."असे त्यांनी व्याख्या मांडली आहे.ऑगस्त कॉम्त यांचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी फ्रान्समध्ये झाला.त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये फ्रेंच विचारवंत सेंट सायमन, बेंजीबियन फ्रेंक्लिन ,बोरनॉल्ड्स मास्टर त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या.कॉम्त ला एक सर्वश्रेष्ठ आधुनिक विचारावंत म्हणून मानले जाते. 1822 मध्ये त्यांनी पहिले पुस्तक लिहिले आणि 1830 मध्ये त्यांनी " कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी " हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला आणि तो 1842 ला प्रसिद्ध केला.कॉम्त च्या मते भाषा हे परस्पर संपर्क महत्त्वाचे माध्यम आहे त्यामुळे एका पिढीचे दुसऱ्या पिढीकडे आचार - विचार हस्तांतरित करता येतात व संस्कृती संवर्धन व रक्षण करता येते. तसेच समान भाषा बोलणारे व्यक्तिमध्ये आपुलकी भावना निर्माण होते व त्यांच्यात ऐक्याची भावना निर्माण होते. धर्माच्या बाबतीत त्यांनी विचार मांडताना सामाजिक व्यवस्थेसाठी समान आर्थिक श्रद्धाची खूप आवश्यकता असते. समान धार्मिक श्रदांच्या अभावाने समाजाचे अनेक भिन्न गटात विभाजन होते.हे टाळण्यासाठी समाजव्यवस्थेला समान धर्माची गरज असते. थोडक्यात धर्माच्या पाठबळाशिवाय कोणतीही शासन व्यवस्था व्यवस्थित काम करू शकत नाही अशा प्रकारे धर्माच्या आधारामुळेच सरकारी अद्यांना नैतिक अधिष्ठान निर्माण होते.
श्रम विभाजनाच्या बाबतीत भाषा व धर्म या दोन घटकाशिवाय समाजाची अवस्था निर्माण होणार नाही.श्रम विभाजन याचा अर्थ कामाची मागणी होईल प्रत्येक कामाचे लहान भाग पाडण्यात येऊन त्या भागाचे काम वेगवेगळ्या व्यक्तीकडे कृतीप्रमाणे दिल्यास व कौशल्यानुसार दिल्यास त्याचे अस्तित्व इतरांवर प्रभाव टाकते. त्यामुळे त्यांचा विकास होतो सामाजिक गतीशास्त्राच्या विचारानुसार सामाजिक गतीशास्त्रामध्ये सामाजिक विकास अवस्था समाजाची प्रगती यासंबंधी विचार येतो सतत घडणाऱ्या बदलांचे शास्त्र असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक प्रगतीच्या नियमांची माहिती करून घेणे या गतीशास्त्रात महत्त्वाचे आहे. ती सामाजिक प्रगतीचा अभ्यास ऐतिहासिक तत्वज्ञानावर आधारित केला जातो. वर्तमान परिस्थितीत भविष्यकालीन परिस्थितीचा आधार घेऊन मानवी प्रगती प्रक्रियेचा शोध घेणे आवश्यक असतो हा त्याचा हेतू असतो. सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र या समाजशास्त्र दोन्ही विभागांचा वरील आढावा विचारात घेता असे सुचित करायचे आहे की त्यांना सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये मानवी स्वभाव व समाजाची स्थिरचना इत्यादींचा अभ्यास केला जातो तर सामाजिक शास्त्रामध्ये समाजाच्या विकासाचा अथवा प्रगतीचा अभ्यास करण्यात येतो हे दोन्ही विभाग परस्पर संबंधित असल्याने त्यांना एकमेकापासून वेगळी करणे अवघड आहे. ऑगस्तने अनेक समाजशास्त्रीय विचार मांडले. त्यामध्ये विज्ञानवाद अथवा प्रत्यक्षवाद ही संकल्पना सर्वात महत्त्वाची मानले जाते. यामध्ये मानवी बुद्धीचा विकास ही शेवटच्या विकासातील अवस्था आहे. असे त्यांनी मांडले जगातील सर्व घडामोडी नैसर्गिक नियमानुसार घडून येत असतात. त्यामुळे हे नियम समजावून घेताना काल्पनिक अथवा तांत्रिक विचारांचा उपयोग होत नाही तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचाच अवलंब केला पाहिजेत. जागतिक घटना व घडामोडी कडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आणि त्यातून मिळणारे ज्ञान यालाच विज्ञानावाद म्हणावे असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये प्रभावशाली अशी विचार मांडले
मानवाच्या अवस्थांच्या तीन कल्पना आहेत तीन नियम त्यांनी मांडले आहेत.
काल्पनिक किंवा असत्य अवस्था त्यामध्ये चेतनावाद बहुदेवाद एकेश्वरवाद असतो तसेच अध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था वैज्ञानिका अवस्था किंवा प्रत्यक्ष अवस्था याचे त्यांनी मूल्यमापन सुद्धा केलेले आहे त्यामुळे ज्ञान विज्ञान अवस्थेत उपयोगी पडत नाही. अशावेळी सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करताना केवळ कारणांचा विचार न करता निरीक्षण वर्गीकरण सिद्धांतिक इत्यादी मार्गाने मिळणारे ज्ञान स्वीकारणे खूप फायदेशीर ठरते.यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला आहे. असे आपल्या ग्रंथाद्वारे समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केलेलं आहे.कॉम्तचे सर्व तत्त्वज्ञान अभिजात आणि सामाजिक विचारांच्या इतिहासात अद्वितीय आहे.
" दुसऱ्यासाठी जगा " हा प्रत्यक्षवादी समाजव्यवस्थेची विचारात घेता आपणास त्याच्या समाजशास्त्राची उंची किती आहे हे समजू शकते.त्यांच्या समाजशास्त्रीय विचारासंबंधी शेवटी असे म्हणतात की त्याची विचार हे त्या काळाच्या मानाने फारच पुढचे होते. सामाजिक विचारांचा अभ्यास करणाऱ्या कॉम्त च्या विचारातून विविध असे नवीन माहिती मिळते असे म्हटले तर व चुकीचे ठरणार नाही.सध्याच्या विज्ञान व आधुनिक युगात हे विचार मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणारे आहेत.
No comments:
Post a Comment