Wednesday, 29 November 2023

मौजे वडगांव गावचावडी साठी निधी दयावामहसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जुन्या गाव चावडीसाठी  निधी उपलब्ध करून देऊन तलाठी कार्यालय , ग्रंथालय, अभ्यासिका , यासाठी नविन इमारत उभी करूण गतवैभव प्राप्त करून दयावे आशा मागणीचे निवेदन उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा पं सदस्य सुरेश कांबरे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.
               मौजे वडगांव येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील गावचावडी हि जुनी इमारत होती. या इमारती मध्ये १९५६ ते २००२ पर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार चालत होता . ग्रामपंचायत व तलाठी अशी दोन्ही कार्यालय एकत्र या इमारती मध्ये होती. ग्रामपंचायत , तलाठी, कोतवाल , आदी प्रशासकीय घटक याच गावचावडीतून आपल्या गावचा कारभार पाहत होते . स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी इमारत आसल्याने ती मोडकळीस आली होती. ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण होण्या आगोदर त्याचे शासकीय निर्लेखन करून ती इमारत उतरवून घेण्यात आली .
            सध्या तलाठी कार्यालयासाठी इमारत नसल्याने गावातील ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी हेरले सज्ज्यावर जावून हेलपाटे मारावे लागतात . गावात गावचावडीसाठी जागा उपलब्ध असून त्यामध्ये तलाठी कार्यालय, ग्रंथालय , आभ्यासिका, आशा विविध समस्यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे इमारतीसाठी निधी उपलब्ध करूण दयावा आशी मागणी करण्यात आली .
            यावेळी महसूलमंत्री ना. राधाकुष्ण विखे पाटील यांनी निवेदन वाचून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना ताबडतोब या संदर्भातील प्रस्ताव तयार करून देण्याचे तोंडी आदेश दिले . यावेळी खास . धैर्यशील माने , जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश कांबरे उपस्थित होते .

फोटो 
राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना गावचावडीच्या निधी मागणी बाबत निवेदन देताना उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा पं . सदस्य सुरेश कांबरे

No comments:

Post a Comment