Saturday, 2 December 2023

पाठ्यपुस्तक मंडळावर डॉ.दिपक शेटे यांची निवड


हेरले /प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधक मंडळ बालभारती पुणे येथे  स्वातंत्र सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँण्ड ज्युनिअर कॉलेज मिणचे ता. हातकणंगले या शाळेतील सहाय्यक शिक्षक, महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. दिपक मधुकर शेटे यांची गणित समितीवर सदस्यपदी निवड झाली. या निवडीचे पत्र पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले.
  डॉ. दिपक मधुकर शेटे हे गेली 23 वर्षे गणित विषयाचे अध्यापन करत आहेत त्यांचा शालांत परीक्षेचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागत आहे. त्यांनी स्वखर्चाने सुमारे 35 लाख रुपयाची घरी गणितायन नावाची गणित प्रयोगशाळा उभारले आहे.गणितज्ज्ञ,पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक इ. तब्बल 15000 व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला आहे. गणितात नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवल्याबद्दल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. दहावीचे गणित पुस्तक एका पानात, अंकवेल, गणित नियम व सुत्रे,गणिताची शुद्धलेखन,गणित कोष इ .पुस्तकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे.त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाने क्रांती युती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे .तसेच त्यांना दोन राष्ट्रीय व 127 इतर पुरस्कारानी सन्मानित केलेला आहे. त्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डी. एस. घुगरे, संस्थेचे सचिव व उपप्राचार्य एम. ए. परीट यांचे मार्गदर्शन लाभले. गणितप्रेमींच्या मार्फत त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a Comment