कोल्हापूर / प्रतिनिधी
१४ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत एकमताने घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली.
सर्व शासकिय, निमशासकिय कर्मचारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती नंतर जूनी पेन्शन मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मार्च २०२३ मध्ये ७ दिवसांचा बेमुदत संप केलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. गेल्या नऊ महिन्यात जुन्या पेन्शन बाबत कोणताही ठाम निर्णय न घेतल्याने तीव्र असंतोष सर्व कर्मचाऱ्यांत निर्माण झाला आहे. जुनी पेन्शन हक्काची असून ती मिळालीच पाहिजे म्हणून पुन्हा १४ डिसेंबर पासून बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांच्या संघटना संपात सहभागी होत आहेत. संप काळात सर्व संपावरील कर्मचारी दररोज सकाळी ११ वाजता टाऊन हॉल कोल्हापूर येथे एकत्रित येऊन शासनाचा निषेध करतील.
चौकट
संपात सहभागी होणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी आपआपल्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांना संपात सहभागी होत असेलेले पत्र द्यावे व मुख्याध्यापक / प्राचार्यांनी आपल्या संस्था चालकांना ते पत्र द्यावे. तसेच त्याची एक प्रत व्यासपीठास द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी नागपूर हून फोन वरून सर्वांनी संप यशस्वी करावा असे आवाहन केले.
शिक्षक नेते दादा लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, भरत रसाळे, बाबा पाटील, व्ही. जी. पोवार, प्रा. सी. एम. गायकवाड,सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, सुदेश जाधव, काकासाहेब भोकरे, के. के. पाटील, एम. एन. पाटील, के. एस. पोतदार, आर. बी. पाटील, अरुण मुजुमदार, जयसिंग पोवार, सुरेश जाधव, श्रीधर गोंधळी, मनोहर पाटील, श्रीकांत पाटील, गजानन काटकर, संतोष आयरे, मनोहर जाधव, सुनिल कल्याणी, अनिल चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर: शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना अध्यक्ष एस.डी.लाड शेजारी शिक्षक नेते दादा लाड, सुरेश संकपाळ व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment