Saturday, 9 December 2023

राष्ट्रीय खो खो स्पर्धेत अमृता बाबासो पाटीलला सुवर्णपदक

कोल्हापूर /प्रतिनिधी
 ३ ते ७ डिसेंबर 2023 यादरम्यान नाशिक येथे संपन्न झालेल्या शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेची खो खो ची विद्यार्थिनी कु. अमृता बाबासो पाटील हिला सुवर्णपदक मिळाले.
   या स्पर्धा  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या आयोजनाखाली व भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेमध्ये पूर्ण भारतातून  २७ राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना अंतिम सामना हा गुजरात संघाशी झाला अंतिम सामन्यांमध्ये कु. अमृता बाबासो पाटील हिने उत्कृष्ट आक्रमण करून विरुद्ध संघाचे  ७ गडी बाद केले व विजयश्री खेचून आणला या स्पर्धेतून भारतातील सर्वोत्कृष्ट आक्रमकचा पुरस्कार 
कु. अमृता बाबासो पाटील हिला  देण्यात आला.
  जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,  मुख्य वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी व प्रशिक्षक भिमराव भांदीगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ  आंबोकर, गटशिक्षणाधिकारी  करवीरचे
समरजीत पाटील,प्रशिक्षक भीमराव  भांदिगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आदी मान्यवरांच्या हस्ते 
कु. अमृता बाबासो पाटील हिचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती प्रसिद्धीस शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी दिली.
     फोटो 
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील 
कु. अमृता बाबासो पाटील हिचा सत्कार करतांना शेजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ  आंबोकर, गटशिक्षणाधिकारी  करवीरचे
समरजीत पाटील,प्रशिक्षक भीमराव  भांदिगरे,आदी मान्यवर

No comments:

Post a Comment