हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्त्यां सविता सावंत यांची भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामिण महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र भाजपा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी त्यांना माजी आम . अमल महाडिक, , जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील ,उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा. प . सदस्य स्वप्नील चौगुले, माजी ग्रा.पं सदस्य अविनाश पाटील , सामाजिक कार्यकर्ते अमोल झांबरे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले . निवडीचे पत्र मिळताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला .
No comments:
Post a Comment