Monday, 1 January 2024

पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना विशेष पुरस्कार

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पत्रकार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 
पत्रकार दिनानिमित्त रविवार ता.७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता अतिग्रे
 (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
 दै.तरुण भारतचे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.  संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, बी.न्यूज.चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, प्राचार्य डॉ. विराट गिरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
  सन २०२४ साठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार डॅनियल काळे ( दै. पुढारी) जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
 इलेक्ट्रॉनिक मीडिया रणजित माजगावकर(साम टि.व्ही),जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रा. शामराव पाटील (दै.पुढारी),जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार दिलीप पाटील (दै.तरुण भारत),जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार आनंदा काशिद (दै. महासत्ता)
  तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२४ चे मानकरी निपाणी - शिवाजी येडवान
 (दै. महासत्ता),चंदगड - विलास कागणकर (दै.पुण्यनगरी), शाहूवाडी - विलास पाटील (दै. तरुण भारत),पन्हाळा  सरदार काळे (दै. सकाळ), कृष्णात हिरवे (दै.पुढारी),करवीर तालुका - रामचद्र रोटे ( बुलंद पोलीस टाईम्स), कागल - कृष्णात माळी (दै. सकाळ), शशिकांत भोसले (दै. लोकमत),राधानगरी -
प्रा. सुहास जाधव(दै.सकाळ),गगनबावडा - संभाजी पाटील (दै.पुढारी),
शिरोळ-अतुल भोजणे(दै.पुण्यनगरी)
गणपती कोळी(दै.लोकमत),हातकणंगले - रवीद्र राजाराम पाटील (दै.सकाळ),गजानन खोत (दै. सकाळ /दै.महासत्ता),गणपती लुगडे (दै.पुण्यनगरी),आजरा-संभाजी जाधव(दै. जनमत),भुदरगड  रवींद्र देसाई ( दै.पुढारी),मारूती घाटगे( दै.पुढारी),
गडहिंग्लज -दिनकर गुरव (दै.पुण्यनगरी) आदी कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पत्रकारांचे पुरस्कार व निपाणी तालुक्यातील पत्रकारांचे पुरस्कार जाहीर झाले. 
या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुधाकर निर्मळेव उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी केले.
यावेळी सचिव सुरेश पाटील, खजिनदार सदानंद कुलकर्णी, कौन्सील मेंबर ताज मुल्लाणी, प्रा. भास्कर चंदनशिवे, प्रा.रवींद्र पाटील, अतुल मंडपे, सुरेश कांबरे कोअर कमिटी मेंबर सतीश पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment