Saturday, 20 January 2024

वडगाव विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

पेठवडगाव /  प्रतिनिधी
 वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावचे वार्षिक स्नेहसंमेलन  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.दोन दिवसाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये 16 जानेवारी  रोजी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते या आणि गेम्स मध्ये वेगवेगळ्या गेम्स बरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या खाऊचे स्टॉल मांडण्यात आले होते. बुधवार १७ जानेवारी रोजी  रोजी विद्यालयात सायंकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
    कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी उपनगराध्यक्ष रंगराव बावडेकर, श्रीमती प्रविता सालपे, टीव्ही सिरीयल व चित्रपट अभिनेत्री मंजुषा खेत्री,  सुकुमार पाटील, रमेश बेलेकर, संदीप पाटीलसह,माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांचे शाल व फुलाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
    विद्यालयाच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले  स्वागत व प्रस्तावित सौ आर आर पाटील यांनी केले या कार्यक्रमांमध्ये  बबन गाताडे यांचा  विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार प्राचार्य बाळ डेळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणमहर्षी कै एम आर देसाई  टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले विद्यालयाचे शिक्षक ए. ए. पन्हाळकर व  एस.आर. पाटील यांचा ही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस. ए. पाटील यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीताचे गायन व नृत्य कलेचा अविष्कार सादरीकरण करून प्रक्षेकांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ए. ए. पन्हाळकर व विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले.
    या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य बाळ डेळेकर यांचे उत्कृष्ट संयोजनासह विशेष मौलीक मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख  डी एस कुंभार, सौ एस ए पाटील, सौ एस एस चौगुले, ए ए पन्हाळकर, सौ एस के वाघमोडे यांनी केले.
 उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे,  पर्यवेक्षिका सौ आर आर पाटील, परीक्षा विभाग प्रमुख  डी एस शेळके, तंत्र विभाग प्रमुख  अविनाश आंबी, कार्यवाह के. बी. वाघमोडे, अतुल पाटीलआदीसह  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक विदयार्थी उपस्थित होते.
  फोटो 
वडगाव विद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमांमध्ये  बबन गाताडे यांचा  विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करतांना प्राचार्य बाळ डेळेकर शेजारी माजी उपनगराध्यक्ष रंगराव बावडेकर व माजी उपनगराध्यक्ष श्रीमती प्रविता सालपेसह अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment