Wednesday, 31 January 2024

मौजे वडगावातील भुयारी मार्गा संदर्भात खा . मानेची प्रत्यक्ष भेट

हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे नागपूर रत्नागिरी या महामार्गाच्या कामाबाबत व मौजे वडगाव येथे भुयारी मार्ग करणे संदर्भांत गावातील शेतकरी व ग्रामस्यांच्या आडचणी जाणून घेण्यासाठी खा . धैर्यशील माने यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी , महसूल अधिकारी यांचे उपस्थितीत चर्चा करूण शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा खुलासा केला . सदर ठिकाणी भुयारी मार्ग झाल्यास भविष्यात कोणत्या आडचणीस सामोरे जावे लागणार आहे याचा खुलासा करूण सबंधीत अधिकाऱ्यांना काय पर्याय करता येईल ते पहा असे तोंडी आदेश दिले.
           यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा पं . सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , सविता सावंत , सुवर्णा सुतार, ग्रामसेविका भारती ढेंगे , मंडल अधिकारी बेळणेकर मॅडम ,तलाठी सचिन चांदणे , श्रीकांत सावंत , रावसाहेब चौगुले, मनोहर चौगले , सतिश वाकरेकर, अविनाश पाटील, आनंदा पोवार , आनंदा थोरवत , यांच्यासह अधिकारी वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
नागपूर रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भांत चर्चा करतांना खा. धैर्यशील माने व शेतकरी वर्ग

No comments:

Post a Comment