हेरले / प्रतिनिधी
श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती हेरले (ता. हातकणंगले) यांच्या वतीने जाणता राजा, युगपुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. १५ रोजी सकाळी ७.०० वा. हनुमंतास महाअभिषेक घालून दुपारी १२ वा. ४५ झेंडा चौक येथे भूमिपूजन कार्यक्रम हेरवाडकर मामा यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,कामधेनू समुह नेते चेअरमन आदगोंडा पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच राहुल शेटे, उपसरपंच बक्तियार जमादार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,बटूवेल कदम, सुकुमार लोखंडे, मज्जित लोखंडे, विनोद वड्ड, निलेश कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विजय कारंडे, विजय भोसले,सरपंच राहुल शेटे, माजी सभापती राजेश पाटील, चेअरमन आदगोंड पाटील, कपिल भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन विजय कारंडे, विजय भोसले, संतोष भोसले, बाजीराव हवलदार, बबलू निंबाळकर, कपिल भोसले, राहुल कराळे,गणेश ढेरे,नंदू माने, विजय पाटील, प्रवीण सावंत, दीपक जाधव, मंदार गडकरी, सौरभ भोसले,अदीक इनामदा, कृष्णात खांबे, राजू कागले,सचिन थोरवत,सयाजी गायकवाड, भोपाल रुईकर, बंडू खांडेकर, ऋषिकेश लाड यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येंनी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
हेरले येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन झेंडा चौक येथे करतांना हेरवाडकर मामा व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment