कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व मानदेशी फाउंडेशन म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर कडील आदर्श शाळेतील शिक्षकांना निवासी क्रीडा प्रशिक्षण दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी अखेर कनेरी मठ येथे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण हे दोन टप्प्यात होत असून यावेळी बोलत असताना शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षण अधिकारी यांनी राज्याच्या व कोल्हापूर जिल्ह्याचा तुलनात्मक आढावा घेत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची गुणवत्ता त्यांचे योगदान एकंदरीत सर्व शैक्षणिक कामकाजाची कौतुक केले तसेच आपण स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले चा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या प्रेरणेतून माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत क्रीडा शिक्षकांना पायाभूत प्रशिक्षण मानदेशी फाउंडेशन मसवड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे .शिक्षकांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर शाळेच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी प्रयत्न करावेत प्रशासन सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सदर प्रशिक्षण अंतर्गत शिक्षकांना कबड्डी, खो-खो, ऍथलेटिक्स फील्ड, पोक्सो सामाजिक जाणीव पूरक व पोषक आहार खेळातून विकास यांचे प्रशिक्षण एन आय एस कोचमार्फत देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले. या प्रास्ताविकामध्ये त्यांनी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाचा उद्देश व प्रत्यक्ष कार्यवाही याचा आढावा सादर केला प्रशिक्षण काळातील आपले अनुभव तुषार पाटील,उमा लोणारकर ,गुरव मॅडम यांनी व्यक्त केले प्रशिक्षण काळात मानदेशी फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य दाखवणाऱ्या शिक्षक खेळाडूंना पुढील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी काम करणारे ओंकार गोजारी व त्यांचे सर्व सहकारी मानदेशी फाउंडेशन, काशिनाथ कुंभार 'हरिदास रणदिवे 'अरुण गायकवाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समारोप कार्यक्रमासाठी शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांचे सोबत समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम मठाचे व्यवस्थापक प्रल्हाद जाधव शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कांबळे यांचेसोबत मठाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले तर आभार तुषार पाटील यांनी मानले.
फोटो
जिल्हा परिषद कोल्हापूर कडील आयोजित आदर्श शाळेतील शिक्षकांचे निवासी क्रीडा प्रशिक्षण प्रसंगी बोलतांना प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर
No comments:
Post a Comment