हेरले /प्रतिनिधी
हेरले येथील सिद्धेश्वर नगर,संजय गांधी नगर, वीर हनुमान नगर परिसरात इंडस टॉवर लिमेडेड कंपनीचे टॉवर बांधण्यात येणार आहेत. टॉवर नियमाप्रमाणे हा लोकवस्तीत नसावा त्या टॉवरच्या आसपास शाळा, दवाखाने नसावेत असे नियम असतांना हे सर्व नियम धाब्यावर बसवत इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीने येथे टॉवर बांधण्याचा घाट घातला आहे.
या परिसरात उर्दू शाळा, केंद्र शाळा, कन्या शाळा,शाळा नंबर दोन आदी ज्ञानमंदीरामध्ये हजारो मुले शिक्षण घेत आहेत. टॉवर बांधण्यासाठी लागणारे बांधकाम परवाना सर्टिफिकेट व शेजाऱ्यांची मान्यता असलेले पत्र आजवर या टॉवर मालकांनी येथील नागरिकांना दाखवलेले नाही. येथील नागरिकांशी कोणतीही चर्चा केली नाही. हा टॉवर होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी ग्रामपंचायत व तलाठ्यांना लेखी तक्रारी अर्जावर येथील राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सहृया करून दिल्यानंतरही त्यांना उत्तर न देता इंडस टॉवर लिमिटेडचे पदाधिकारी येथील नागरिकावर दबाव आणून टॉवरचे बांधकाम सुरू करण्याचे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी याला वेळीच लगाम लावून टॉवरचे बांधकाम बंद करावे व हेरले येथील गट क्रमांक ७/अ व ७ ब मधील इंडस टॉवर लिमिटेडचे मोबाईल टॉवर बांधकामापासून लोकवस्तीचे अंतर मोजून द्यावे असे लेखी निवेदन गोविंद आवळे व अमिर जमादार यांनी सिद्धेश्वर नगर,हनुमान नगर, राजीव गांधी नगर व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावकामगार तलाठी यांना दिले आहे.न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील समस्त नागरिकांनी दिला आहे.
फोटो
हेरले: येथील सिद्धेश्वर नगर,संजय गांधी नगर, वीर हनुमान नगर परिसरात इंडस टॉवर लिमेडेड कंपनीचे टॉवर बांधण्यात येणार आहे त्या विरोधात एकत्रित नागरिकांच्या सभेत बोलतांना गोविंद आवळे व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment