हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(गोकुळ) च्या ६१ व्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिना निमीत्त जाहीर करण्यात आलेल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हयातील बारा तालुक्यातील प्रथम क्रमांक आलेल्या सर्व संस्थाना गोकुळ चेअरमन अरूण डोंगळे व जेष्ट संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील तय हनुमान संस्थेस तालुका प्रथम क्रमांक प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले.
जय हनुमान सहकारी दूध व्याव संस्था मर्या. मौ.वडगांव या संस्थेचा सन २०२२- २३ मध्ये हातकणंगले तालुक्यात प्रथम क्रमांक आला. संस्था चेअरमन सतिश चौगुले व्हा.चेअरमन नेताजी माने यांनी चेअरमन अरूण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र स्वीकारले.
जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. मौ. वडगांव ही संस्था सन २००७ ला स्थापन झाली. १७ वर्षात संस्थेने उच्च्यांकी दुध फरक बिल देवून संस्थेचे नांव जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले आहे.
सदरची संस्था मार्गदर्शक कै. बाळकृष्ण यादव यांच्या आशीर्वादाने, संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत, संस्थापक व्हा.चेअरमन व विद्यमान चेअरमन सतिश चौगुले, माजी चेअरमन महादेव शिंदे,नेताजी माने, जयवंत चौगुले यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीपणे सुरु आहे.
गेल्या चार वर्षात संस्थेने गाय दुधाला प्रतिलिटर ५ रु व म्हैस दुधास प्रतिलिटर १० रु इतके उच्चांकी दिपावली फरक बिल दिले आहे. संस्थेने सभासदांचा विमा, जनावरांचा विमा, वैरण, बियाणे, चॉपकटर , दुध किटली , दुध अॅडव्हान्स व ३ , १३, २३ या तारखेला दर दहा दिवसांनी गोकुळकडून जमा होणारे दुध बिल वाटप प्रत्येक सभासदाच्या खातेवर जमा करत आले आहेत, तर संपूर्ण व्यवहार हा कॅशलेश पध्दतीने सुरू आहे. याकामी संस्था सचिव आण्णासो पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.
विद्यमान संचालक मंडळाने संस्थेला जागा खरेदी करून सुमारे २५ लाख रू. इतक्या बजेटची संस्थेची स्वतःची इमारत उभी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
या संस्थेच्या जडणघडणीमध्ये संस्थेचे चेअरमन सतिश चौगुले, व्हा.चेअरमन इंदूताई नलवडे, संचालक बाळासो थोरवत, महादेव, शिंदे, नेताजी माने, रावसो भू.चौगुले, शकील हजारी, सुरेश कांबरे, जयवंत चौगुले,सुभाष मुसळे, महादेव चौगुले, संचालिका जयश्री यादव, जयश्री रजपूत, संस्था सचिव आण्णासो पाटील, कर्मचारी विलास घुगरे, सोमनाथ जंगम, वर्षा कांबळे व दूध उत्पादक, शेतकरी, ग्राहक आदींचे योगदान आहे.
फोटो.....
मौजे वडगाव येथील जय हनुमान दूध संस्थेस प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून गौरवताना चेअरमन अरचण डोंगळे, संचालक विश्वासराव पाटील व मान्यवर पदाधिकारी.
No comments:
Post a Comment