कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने पालक मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन सध्या सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संच मान्यता शासन नियमाने होणे आवश्यक आहे . वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना १०० एवढी विद्यार्थी संख्या तसेच हायस्कूल संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना ६० एवढी विद्यार्थी संख्या ग्राह्य मानून संच मान्यता करावी
आणि अनेक शिक्षकांना अतिरिक्त होण्या पासून वाचवावे आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाना दिलासा द्यावा. या मागणीसाठी लेखी निवेदन दिले.
संच मान्यता करताना २००९ च्या शासनादेश स्थगित असताना त्याच आदेशाने अजून हि का केली जाते आहे अशी माहिती मंत्री महोदयांना दिली . मंत्री महोदयांनी तात्काळ शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना फोनवरून याबाबत विचारणा केली आणि येत्या शुक्रवारी याबाबतचे बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गी,सरचिटणीस प्रा.संजय मोरे , कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे , सहसचिव प्रा. बी. के. मडीवाळ, प्रा. गोविंद भोसले ,प्रा. डॉ.अमित रेडेकर प्रा.संग्राम तोडकर,प्रा.संभाजी पाटील, प्रा.मनगुत्ती हे यावेळी उपस्थित होते.अशी माहिती प्रसिध्दीस अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गी यांनी दिली.
फोटो
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना लेखी निवेदन देतांना अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गीसह संघटनेचे पदाधिकारी.
No comments:
Post a Comment