हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी हनुमान भक्तांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती.
सोमवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव व बंडू गुरव यांनी पूजा, मंत्रपठन, पुष्पाजंली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला. सकाळी हनुमान जन्मोत्सोव सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये हनुमतांची मुर्ती व गदेची पूजा करून श्री हनुमान मंदिररास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. 'श्री रामभक्त हनुमान की जय' या जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रांगेन जाऊन भक्तांनी दर्शन घेतले.
या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजन विजय कारंडे, अप्पासो कागले, वसंत जाधव, नंदकुमार माने,संतोष भोसले, पांडुरंग शिंदे, शिवराज निंबाळकर, राहुल कराळे, बाबासो रुईकर, संदीप कागले, , जयसिंग गडकरी, कृष्णात खांबे,धनराज कारंडे,सौरभ भोसले, अमोल कारंडे, विजय पाटील, सुनिल कारंडे, पांडूरंग राबाडे, दौलत साळुंखे, दीपक जाधव, अदीक इनामदार, कपिल भोसले, विजय भोसले, ऋषिकेश लाड, नारायण खांडेकर आदींनी केले.
फोटो
हेरले : हनुमान जन्मोत्सोव सोहळा.
No comments:
Post a Comment