हेरले /प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यु. कॉलेज व दिशा इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेतील विद्यार्थी तन्मय राहुल साळुंखे या विद्यार्थ्यांने बनविलेल्या Easy Maintenance Street Lamp या उपकरणाची राज्यस्तरीय inspire award manak स्पर्धेसाठी निवड झाली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड मानक जिल्हास्तरीय स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जि.प. कोल्हपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,माधमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राचार्य विराट गिरी, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे,उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे,उपशिक्षणाधिकारी अजय पाटील,एनआयएफ प्रतिनिधी सचिन भास्कर
विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे,जयश्री जाधव, धनाजी पाटील, विश्वास सुतार, दगडू कुंभार,आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडल्या.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण 147 उपकरणे सहभागी झाली होती.यातून केवळ 15 उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये प्रशालेच्या तन्मय साळुंखे या विद्यार्थ्यांने बनविलेल्या उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सदर विद्यार्थ्यास प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने,सचिवा सुवर्णा माने यांची प्रेरणा व डोंगरे बी. ए. सर्व विज्ञान विभाग शिक्षक,अटल लॅब शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
फोटो
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां सोबत
जि. प. कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. सचिव सुभाष चौगुले,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राचार्य विराट गिरी, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील,एनआयएफ प्रतिनिधी सचिन भास्कर
विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे,जयश्री जाधव, धनाजी पाटील, विश्वास सुतार, दगडू कुंभार,
No comments:
Post a Comment