हेरले / प्रतिनिधी
प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये जे प्रशिक्षण दिले जात आहे. अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावे जेने करून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणी शिवाय मतदान प्रकिया सुरळीतपणे पार पाडता येईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार कल्पना ढवळे यांनी केले.
त्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या २७८ हातकणंगले विधानसभा मतदार संघाच्या वतीने आयोजित पहिले प्रशिक्षण प्रसंगी बोलत होत्या.
तहसिलदार ढवळे पुढे म्हणाल्या सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करत राहिल. प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतू-परंतू न ठेवता आपल्या शंकाचे निरसन अधिकाऱ्यांकडून घ्यावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.
संजय घोडावत विद्यापीठामध्ये दोन सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झाले.सकाळच्या सत्रांमध्ये - ४ ९२ मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थी पैकी केंद्राध्यक्ष - १०६ व 1क्रमांक एक मतदान अधिकारी - ११९ व क्रमांक दोन मतदान अधिकारी व क्रमांक तीन मतदान अधिकारी - २६७ उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रांमध्ये -४९२ पैकी वरील प्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते.दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रशिक्षण केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रशिक्षण केंद्रास अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, अतिरिक्त सहाय्यक निवडणून निर्णय अधिकारी तहसिलदार कल्पना
ढवळे, नायब तहसिलदार दिगंबर सानप आदींचे मार्गदर्शन लाभले.
फोटो
संजय घोडावत विद्यापीठामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार उपजिल्हाधिकारी शक्ती कदम करतांना शेजारी अन्य मान्यवर
(छाया सतिश खोत )
No comments:
Post a Comment