कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोजिमाशि पतसंस्थेस ३१ मार्च २०२४ अखेर निव्वळ नफा ४ कोटी ८७ लाख व मार्च अखेर संस्थेने ठेवीचा ६०० कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. या आर्थिक वर्षात सभासदांना उच्चांकी लाभांश दिला जाणार आहे.अशी माहिती संस्थेच्या प्रधानकार्यालय येथे पतसंस्थेचे चेअरमन श्री उत्तम पाटील सर व तज्ञ संचालक श्री दादा लाड सर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. ते पुढे म्हणाले पतसंस्थेवरील सभासद व ठेवीदारांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.
कोजिमाशि पतसंस्थेस ३१ मार्च अखेरचा लेखाजोखा नुकताच सादर करण्यात आला. शिक्षक नेते व संस्थेचे तज्ञ संचालक श्री दादासाहेब लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची अर्थिक घोडदौड सुरू असून वाढती कर्ज मागणी व ठेवीचा तेवढाच ओघ हे सभासद व ठेवीदार यांच्या विश्र्वासाचे प्रतिक आहे. ३१ मार्च २०२४ अखेरीस संस्थेने ४८४ कोटी १३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. गुंतवणूक २२८ कोटी २ लाख, निधी ४४ कोटी ३२ लाख, शेअर्स २८ कोटी ४३ लाख . तसेच मयत सभासदांची कर्जमाफी १४ कोटी ६ लाख रुपयांची करण्यात आली आहे. एकूण कर्ज मर्यादा ४२ लाख असून सभासद कर्ज १० टक्के दराने आहे. त्याचबरोबर १ जुलै २०२४ पासून ९ टक्के व्याजदराने तातडीचे २ लाख रुपये कर्ज वाटप सुरू केले आहे.
दरवर्षी सभासदांच्या यशवंत व गुणवंत पाल्यांचा सत्कार , कन्यादान साडीसाठी व कन्याजन्म स्वागतासाठी संस्थेमार्फत धनादेश व ठेवपावती तसेच सभासद कल्याण निधीतून वैद्यकीय कारणासाठी सभासदांना आर्थिक मदत केली जाते.
संस्थेकडे प्रधान कार्यालयासह ११ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. सर्व शाखामध्ये संगणीकृत,सीसी टिव्ही कक्षेत व एस. एम.एस.सुविधा आहेत. संस्थेमध्ये लवकरच कोअर बॅकिंग सेवा सुरू होत आहे.
आपत्ती ग्रस्त सभासद व शाळांना आधार भेट वाटप करण्यात आले आहे . संस्था सुवर्ण महोत्सव प्रसंगी सभासदांना प्रवासी बॅग व शाळांना वॉल क्लॉक भेट दिलेली आहे. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकांत कदम ,सीईओ जयवंत कुरडे व सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment