हेरले / प्रतिनिधी
टोप ता.हातकणंगले येथील सर्वसामान्य कुटुंबातील स्वरूप सुभाष पाटील याने महाकठीण असणाऱ्या चार्टड अकाउंटंटच्या परीक्षेत सलग १४ तास अभ्यास करत अथक प्रयत्नाने जिद्दीने यशाला गवसनी घातली आहे.
स्वरूप पाटील चे शिवराज विद्या मंदिर ला प्राथमिक तर माध्यमिकचे शिक्षण बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगावला झाले. सर्वांनाच नको वाटणारा पण अवघड असणारा गणित विषय स्वरूप च्या आवडीचा होता.वडील सुभाष पाटील हे शेती सांभाळून सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्याचे काम पाहतात.त्याचे अनुकरण करत.
यातून आपले करीअर करण्याचे त्याने ठरविले.त्यानुसार स्वरूप पाटील ने कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेज येथून १२ वी उत्तीर्ण झाला. व सि.ए अभ्यासक्रमांची निवड केली. या परीक्षेत सुरवातीला फौंडेशन, इंटरमेडीट व अंतिम परीक्षा असे स्वरूप असते. यासाठी स्वरूप पाटील यांनी विद्यालयातील मार्गदर्शन तसेच पुणे मुंबई येथील सि. ए परीक्षेचे ऑनलाईन क्लासेस, यु ट्यूबच्या माध्यमातुन तसेच दररोजचा नियमित सलग बारा ते चौदा तास अभ्यास करत होता. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.ही परीक्षा उत्तीर्ण व्हावयाचे असल्यास स्वतःमध्ये शिस्त बाणवावी लागते. अभ्यासात सातत्य असावे लागते. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असावी लागते.आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून वेळच्या वेळी अभ्यास करावाच लागतो. हे सर्व थोडे कठीण असले तरी त्यामुळे निश्चितपणे यश लाभते, असे स्वरूप पाटील यांनी सांगितले. यामध्ये वडील सुभाष पाटील आई वैशाली पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
फोटो
स्वरूप पाटील
No comments:
Post a Comment