हेरले / प्रतिनिधी
श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे रविवार दि. २१जुलै रोजी व्यासपूजा (गुरुपौर्णिमा)निमित्त आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सकाळी 'श्री' चे पादुकांना अभिषेक, नोंदणी व चहापान,सकाळी भजन श्री भजनी मंडळ हेरले तबला साथ: शौकत गुरुजी, प्रवचन: परमार्थभूषण ह.भ.प.श्री. नारायण एकल महाराज, जोगेवाडी.दुपारी श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण,प्रवचन: गुरुवर्य ह.भ.प. श्री. मधुकर पाटील महाराज, कावणे, सत्कार समारंभ व आशिर्वचन.दुपारी महाप्रसाद,भजन : श्री ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ, हमिदवाडा.सायंकाळी ६:०० ते ७:०० : प्रवचन: ह.भ.प.श्री. अरुण पोवार महाराज, तळाशी.सायंकाळी ७:१६ वा. : सुर्यास्त व आरती या सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मौजे वडगांव यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment