कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार गुरुवारी आर. व्ही. कांबळे यांनी एस. के. यादव यांच्याकडून स्वीकारला.
एस. के. यादव यांच्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारीपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यादव यांनी स्वतःहूनच महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा कार्यभार सोडला. म्हणून त्यांच्याकडील शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा कार्यभार कांबळे यांच्याकडे देण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी १ जुलै रोजी काढला. त्यानंतर नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर
कांबळे यांचा सत्कारही झाला. तातडीने रूजू होण्यासाठी ते महापालिकेत गेलेही होते; पण तब्बल १८ दिवसांनी त्यांना कार्यभार घेण्यात यश मिळाले.
वर्ष २०१२ पासून महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदावर पूर्णवेळ अधिकारी नाही. तेव्हापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ' अधिकारीच पदावर राहिले.
यादव हे डिसेंबर २०२२ पासून या पदाचा कार्यभार सांभाळत होते; मात्र त्यांनी या पदाचा कार्यभार काढून घेण्याची विनंती केल्यानंतर कांबळे यांना संधी मिळाली आहे. पण कांबळे यांनी ही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील विस्तार अधिकारीपदाचा मूळ कार्यभार सांभाळून अतिरिक्त कार्यभार शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचे कामकाज करण्याचा आदेश उपसंचालकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment